ला लिगा : रिअल माद्रिदची एस्पॅनियोल संघावर मात    

टीम ई-सकाळ
Monday, 29 June 2020

स्पॅनिश फुटबॉल लीग 'ला लिगा' स्पर्धेत रिअल माद्रिदने एस्पॅनियोल संघावर 1- ० ने विजय मिळवला आहे. त्यामुळे रिअल माद्रिदच्या संघाने गुणतालिकेत बार्सिलोनापेक्षा दोन अंक अधिक मिळवले आहेत. मागील काही दिवसांपासून बार्सिलोना आणि रिअल माद्रिद संघांमध्ये  'ला लिगा' स्पर्धेत पहिल्या नंबरवरून चढा-ओढ सुरु आहे.  

क्रिकेट जगताला धक्का, कोरोनामुळे संजय डोबाल यांनी गमावला जीव     

सँटियागो बर्नबू या मैदानावर झालेल्या रिअल माद्रिद आणि एस्पॅनियोल यांच्यातील सामन्यात, रिअल माद्रिदचा संघ विजयी झाल्यामुळे या संघाचे गुण 32 सामन्यांमध्ये 71 झाले आहेत. यापूर्वी रिअल माद्रिद आणि बार्सिलोना संघाचे अंक समान झाले होते. मात्र त्यावेळेस रिअल माद्रिद संघाने केलेले गोल बार्सिलोना पेक्षा अधिक असल्याने रिअल माद्रिदचा संघ शीर्ष स्थानावर विराजमान झाला होता. त्यानंतर रिअल माद्रिदने एस्पॅनियोल संघावर 1 - ० ने विजय मिळवल्यामुळे रिअल माद्रिदला 2 अंक मिळाले आहेत.      

टीम इंडिया 'या' महिन्यानंतर उतरणार मैदानात 

रिअल माद्रिद आणि एस्पॅनियोल यांच्यातील सामन्यात माद्रिदच्या करीम बेंजोमो ने 41 व्या मिनिटाला गोल केला. एस्पॅनियोल संघाला सलग तीन सामन्यांमध्ये हार पत्करावी लागली आहे. यापूर्वी रियल बेतिस संघाकडून पराभव स्वीकारावा लागल्याने, एस्पॅनियोलने आपला मुख्य कोच अबेलाडरे यांना बाहेरचा रस्ता दाखवत फ्रांसिस्को रुफेटे यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर देखील एस्पॅनियोल संघाला विजय मिळवता आला नाही. एस्पॅनियोलचा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे. एस्पॅनियोलने 32 सामन्यांपैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर, 18 सामन्यांमध्ये एस्पॅनियोलला पराभव स्वीकारावा लागला आहे.              

​ ​

संबंधित बातम्या