वर्षभरानंतर रवींद्र जडेजा 'वन-डे' संघात 

वृत्तसंस्था
Friday, 21 September 2018

मुंबई : अष्टपैलू हार्दिक पांड्याला झालेल्या दुखापतीमुळे दीर्घ कालावधीनंतर रवींद्र जडेजाला भारताच्या 'वन-डे' संघात स्थान मिळाले. सध्या सुरू असलेल्या आशिया करंडक स्पर्धेदरम्यान पांड्यासह शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल यांनाही दुखापत झाल्यामुळे संघ व्यवस्थापनाने जडेजाला पाचारण केले आहे. 

यापूर्वी जडेजा गेल्या वर्षी जुलैमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात खेळला होता. त्यावेळी त्याने दहा षटकांमध्ये 27 धावाच दिल्या होत्या; पण त्याला विकेट मिळविता आली नव्हती. दरम्यान, भारतीय संघ व्यवस्थापनाने वन-डेमधून आर. आश्‍विन आणि जडेजाला वगळण्याचा निर्णय घेतला. कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहलसारख्या 'रिस्ट स्पिनर'वर निवड समितीने भर दिल्यामुळे आश्‍विन-जडेजा कसोटीपुरतेच मर्यादित राहिले. 

आशिया करंडक स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पांड्याला दुखापत झाली. त्यामुळे तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडला आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलच्या बोटाला दुखापत झाली आहे, तर वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरलाही दुखापतीचा सामना करावा लागत आहे. दीपक चहार आणि सिद्धार्थ कौल यांना संघात स्थान मिळाले आहे. 

इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेतील पहिले चार सामने जडेजाला संघाबाहेरच बसावे लागले होते. पाचव्या सामन्यात संधी मिळाल्यानंतर त्याने पहिल्या डावात झुंजार नाबाद 86 धावा फटकाविल्या होत्या. त्या सामन्यात जडेजाने सात विकेट्‌सही घेतल्या होत्या. त्याच्या या कामगिरीमुळे वन-डेसाठी संघाची दारे उघडल्याचे मानले जात आहे.

संबंधित बातम्या