जडेजाला मिळाला 21 व्या शतकातील उपयुक्त खेळाडूचा मान

टीम ई-सकाळ
Wednesday, 1 July 2020

त्याला क्रिकेट जगतातील सर्वात उपयुक्त खेळाडूंच्या यादीत दुसरे स्थान मिळाले. या यादीत श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन अव्वल स्थानावर आहे. रविंद्र जडेजाने सोशल मीडियाच्या माध्यमातून विस्डेनने दिलेल्या सन्मानाबद्दल आभार व्यक्त केले.

क्रिकेट भक्तांसाठी धर्मग्रंथ समजला जाणाऱ्या विस्डेनने अष्टपैलू रविंद्र जडेजाला 21 व्या शतकातील मौल्यवान खेळाडूची मान दिलाय. 31 वर्षीय जडेजाला 97.3 एमव्हीपी रेटिंग मिळाले आहे. त्याला क्रिकेट जगतातील सर्वात उपयुक्त खेळाडूंच्या यादीत दुसरे स्थान मिळाले. या यादीत श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन अव्वल स्थानावर आहे. रविंद्र जडेजाने सोशल मीडियाच्या माध्यमातून विस्डेनने दिलेल्या सन्मानाबद्दल आभार व्यक्त केले. त्याने ट्विटमध्ये लिहिलंय की, भारतातील सर्वात मौल्यवान खेळाडू म्हणून निवडल्याबद्दल धन्यवाद विस्डेन. माझ्या यशात संघातील सहकारी, प्रशिक्षक आणि शुभचिंतकांचा मोलाचा वाटा आहे. मी त्यांचेही आभार मानतो. देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करणे, हेच माझे लक्ष असून पुढेही देशासाठी बहुमूल्य योगदान देण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरेल, अशा शब्दांत त्याने आपला आनंद व्यक्त केला. 

2011 वर्ल्डकप फिक्सिंग प्रकरण: डी सिल्वाची कसून चौकशी, आता उपुल थरंगाचा नंबर ?

स्पोर्ट जर्नलिस्ट फ्रेंडी विल्डेने देखील जडेजाच्या निवडीसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. जडेजाचे नाव या यादीत पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असेल. तो कसोटी संघाचा नियमित सदस्य नसला तरी त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्याने लक्षवेधी कामगिरी केली आहे.  गोलंदाजी आणि फंलदाजीतील त्याची सरासरी  10.62 धावा इतकी असून शतकातील तो दुसरा असा खेळाडू आहे.  

'धमक असणारा गोलंदाज लाळेशिवाय आमचा चेंडू स्विंग करु शकेल'

जडेजाने 49 कसोटीत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले असून यात त्याने 213 बळी टिपले आहेत. 165 वनडेत त्याच्या नावे 187 विकेट्स घेतल्यात. कसोटीत त्याने 9 वेळा पाचपेक्षा अधिक बळी घेण्याचा पराक्रम केलाय. याशिवाय कसोटीत आणि वनडेत मिळून त्याच्या नावे 5602 धावा असून यात कसोटीतील एका शतकाचा समावेश आहे. जडेजाला जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्याने आपल्यातील क्षमता दाखवून देत आपली उपयुक्तता सिद्ध केली होती. त्याने आपल्यातील अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर अनेक सामन्यात भारतीय संघाला अडचणीतून बाहेर काढत विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. 


​ ​

संबंधित बातम्या