सर जडेजाच्या 'तलवारबाजी' खेळीने भारताचा प्रतिकार 

सुनंदन लेले
Sunday, 9 September 2018

लंडन : कसोटी पदार्पण करणारा हनुमा विहारी आणि दौऱ्यात प्रथमच कसोटी खेळणारा रवींद्र जडेजा या जोडीने पाचव्या कसोटीत भारताच्या प्रतिकाराची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या प्रयत्नांमुळेच भारताला इंग्लंडची पहिल्या डावातील आघाडी 40 धावांपर्यंत मर्यादित राखण्यात यश आले. जडेजा जिगरबाज खेळी करून 86 धावांवर नाबाद राहिला. चहापानाला खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने दुसऱ्या डावात बिनबाद 20 धावा जमा केल्या होत्या. 

तिसऱ्या दिवसांचा खेळ सुरू होताना भारतीय चाहत्यांना मोठ्या अपेक्षा नव्हत्या. भारताचे शेपूट आपल्याप्रमाणे वळवळणार नाही असे इंग्लंड चाहत्यांना वाटत होते. पण, दुसऱ्या दिवस अखेरीस नाबाद असणाऱ्या हनुमा विहारी आणि रवींद्र जडेजा यांनी नेटाने फलंदाजी करत गोलंदाजांना झगडणे भाग पाडले. पदार्पणाच्या कसोटीत हनुमा विहारीने दडपणाखाली अर्धशतक करून छाप पाडली. विहारी आणि जडेजा जोडीने सातव्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी केली. उपहाराला काही मिनिटे बाकी असताना विहारी बाद झाला तो झेल असल्याचा निर्णयही 100% पक्का नव्हता. चेंडू खरच बॅटला चाटून गेला का विहारीची बॅट पॅडला घासली हे स्पष्ट नसताना पंचांनी विहारीला झेलबाद दिले. 

नेहमी चिवट फलंदाजी करणारा ईशांत शर्मा आणि विकेट सहजी फेकून देणारा महंमद शमी लगेच बाद झाले. जसप्रीत बुमराने शून्यावर धावबाद होण्याअगोदर जडेजाला साथ दिली. रवींद्र जडेजाने परिस्थिती लक्षात घेत वेगाने धावा वाढवल्या. अर्धशतक झाल्यावर जडेजाने बॅट तलवारीसारखी फिरवून थाटात आनंद साजरा केला. 11 चौकार आणि 1 षटकारासह 86 धावा काढून जडेजा नाबाद राहिला. चोरटी धाव पळताना बूमरा धावबाद झाला आणि भारताचा डाव 292 धावांवर संपुष्टात आला. 

संक्षिप्त धावफलक 
इंग्लंड 332  भारत पहिला डाव 292 (रवींद्र जडेजा नाबाद 86 -156 चेंडू, 11 चौकार, 1 षटकार, हुनमा विहारी 56 -124 चेंडू, 7 चौकार 1 षटकार, विराट कोहली 40, चेतेश्‍वर पुजारा 37, लोकेश राहुल 37, अँडरसन 2-54, स्टोक्‍स 2-56, मोईन 2-50)

​ ​

संबंधित बातम्या