अश्विनऐवजी चौथ्या कसोटीत खेळणार 'हा' खेळाडू

वृत्तसंस्था
Sunday, 26 August 2018

भारताने तिसरा कसोटी सामना जिंकला असला तरी पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा संघ अद्याप 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला वर्चस्व राखणे गरजेचे आहे. त्यापूर्वीच अश्विनच्या रुपाने भारतीय संघाला धक्का बसला आहे. अश्विनला दुखापत झाल्याने त्याच्याऐवजी अष्टपैलू फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी धक्कादायक बातमी आली असून, ऑफस्पिनर आर. अश्विनला दुखापतीमुळे संघाबाहेर बसावे लागण्याची शक्यता आहे.

भारताने तिसरा कसोटी सामना जिंकला असला तरी पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा संघ अद्याप 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला वर्चस्व राखणे गरजेचे आहे. त्यापूर्वीच अश्विनच्या रुपाने भारतीय संघाला धक्का बसला आहे. अश्विनला दुखापत झाल्याने त्याच्याऐवजी अष्टपैलू फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

अश्विनच्या कमरेला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. अश्विनवर उपचार सुरु असून, तो सरावातही सहभागी झाला नव्हता. अश्विनव्यतिरिक्त भारतीय संघात जडेजाशिवाय एकही फिरकी गोलंदाज नाही. त्यामुळे आतापर्यंत एकही सामना खेळलेला जडेजाला संधी मिळण्याची शक्यता आहे. कुलदीप यादवची शेवटच्या दोन सामन्यांसाठी संघात निवड करण्यात आलेली नाही.

​ ​

संबंधित बातम्या