अश्विनला भोगावी लागणार बीसीसीआयचा लोगो वापरल्याची किंमत

वृत्तसंस्था
Saturday, 26 October 2019

बंगळूर : विजय हजारे करंडक स्पर्धेत कर्नाटकने तमिळनाडूचा सहज पराभव केला. आपला 30 वा वाढदिवस हॅटट्रिकने साजरा करणाऱ्या अभिमन्यू मिथूनने हजारे करंडक राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत कर्नाटकच्या विजेतेपदामध्ये मोलाचा वाटा उचलला. मात्र, या सामन्यात बीसीसीआयचा लोगो वापरला म्हणून त्याला दंड होऊ शकतो. 

तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आलेला अश्‍विन बीसीसीआयचा लोगो असलेले हेल्मेट घाऊन फलंदाजीस आला. बीसीसीआयच्या नियमानुसार त्यांचा लोगो देशांतर्गत स्पर्धेत वापरण्यास मनाई असते. त्यामुळे केएल राहुल आणि मयांक अगरवाल यांनी त्यांच्या हेल्मेटवरील बीसीसीआयच्या लोगावर पट्टी लावली होती. अश्‍विनने नियमाचा भंग केल्यामुळे त्याच्यावर कारवाई होऊ शकते. 
 
​ ​

संबंधित बातम्या