आता अश्विन होणार भारताचा कर्णधार?

वृत्तसंस्था
Thursday, 16 August 2018

इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याला शनिवारपासून (18 ऑगस्ट) ट्रेंट ब्रीज येथे सुरुवात होत आहे. पाठीदुखीमुळे विराट केहली या सामन्यास मुकला तर सध्याचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे ऐवजी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनकडे कर्णधारपद सोपविण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

लंडन : इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याला शनिवारपासून (18 ऑगस्ट) ट्रेंट ब्रीज येथे सुरुवात होत आहे. पाठीदुखीमुळे विराट केहली या सामन्यास मुकला तर सध्याचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे ऐवजी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनकडे कर्णधारपद सोपविण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी कर्णधार विराट कोहलीची तंदुरुस्ती हा चिंतेचा विषय ठरत आहे. पाठीच्या दुखण्याने तो या कसोटीत सहभागी होणार की नाही, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. शनिवारपर्यंत कोहली तंदुरुस्त नाही झाल्यास अजिंक्य रहाणे ऐवजी भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनकडे भारताच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा अत्यंत लाजिरवाणा पराभव झाला. त्यामुळे इंग्लंडने मालिकेत आता 2-0 अशा भक्कम आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यादरम्यान दुसऱ्या डावात कर्णधार विराट कोहलीच्या पाठीत चमक आल्याने त्याला धाव घेतानाही त्रास होत असल्याचे निर्दशनास आले. त्यामुळे 18 तारखेपासून होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली खेळणार कि नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. 

विराट कोहली तिसऱ्या सामन्यात खेळला नाही तर त्याच्या ऐवजी बदली फलंदाज खेळवावा लागेल तर कर्णधारपदही दुसऱ्या खेळाडूकडे सोपवावे लागेल. अशातच भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद सोपविले जाणे हे क्रमप्राप्त आहे. मात्र, सध्या तो स्वत: फॉर्मसाठी झगडत असल्याने त्याच्यावर ही जबाबदारी सोपवण्यापेक्षा अश्विनला ही जबाबदारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

संबंधित बातम्या