रवी शास्त्रींचा नवा 'डाव'; कोण आहे 'ती'

वृत्तसंस्था
Monday, 3 September 2018

बॉलिवूड आणि क्रिकेट विश्व यांच्यातलं कनेक्शन हे जुनं आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेट स्टार्स अशा अनेक जोडी पाहायला मिळतील. काही दिवसापूर्वीच क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे विवाह बंधनात अडकले. अशीच आणखी एक जोडी सध्या चर्चेत आहे.

टीम इंडियाचे मार्गदर्शक रवी शास्त्री आणि 'एअरलिफ्ट'ची अभिनेत्री निमरत कौर यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्याचं ऐकायला मिळत आहे. 

रवी शास्त्री आणि निमरत कौर एकमेकांना गेल्या दोन वर्षापासून डेट करत आहे. 2015 साली एका कार लाँचिगच्या निमित्ताने रवी शास्त्री आणि निमरत कौर यांची भेट झाली होती. तेव्हापासून ते एकमेकांना डेट करत असल्याचं समोर आलं आहे.

Ravi shastri

1985 साली रवी शास्त्री आणि अभिनेत्री अमृता सिंह यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. पण काही दिवसातच दोघांचे मार्ग वेगळे झाले. 1990 साली रितू सिंह यांच्याशी रवी शास्त्री यांचा विवाह झाला. पण 22 विवाहाच्या वर्षानंतर 2012 साली या दाम्पत्याने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आणि विभक्त झाले. दोघांना अलका नावाची मुलगी आहे.  

सध्या रवी शास्त्री टीम इंडीयासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे. रवी शास्त्री आणि निमरतचं नातं नेमकं काय आहे याविषयी सध्यातरी दोघांकडूनही काही सांगण्यात आलेलं नाही.

​ ​

संबंधित बातम्या