राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत पुण्याचा रणवीर मोहिते विजेता

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 November 2019

या स्पर्धेत जामखेड, मुंबई, श्रीरामपूर, जेजुरी, सासवड, वाई, नीरा, सातारा, पुणे, बारामती, नगर, फलटण, सुपे, लोणंद येथील एकूण 154 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. 

सातारा ः फलटण येथील मुधोजी कॉलेज बहुउद्देशीय सांस्कृतिक हॉल येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर यांच्या सहकार्याने कोहिनूर चेस क्‍लबने आयोजिलेल्या फलटण करंडक राज्यस्तरीय जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत पुण्यातील रणवीर मोहिते याने विजेतेपद पटकाविले.
 
या स्पर्धेत वय वर्ष सहा ते 70 वर्षांपर्यंतच्या खेळाडूंसह 44 आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंचा समावेश होता.

स्पर्धेचा बक्षीस समारंभ गोविंद महाराज उपळेकर समाधी ट्रस्टच्या सचिव सुभद्राराजे नाईक निंबाळकर, मुधोजी कॉलेजचे प्राचार्य अरुण गायकवाड, उपप्राचार्य सुरेश ठोंबरे, क्रीडा मार्गदर्शक महेश खुंटाळे आणि कोहिनूर चेस क्‍लबच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

स्पर्धेत मुख्य पंच म्हणून प्रणव टंगसाळे, राज्य पंच मनीषा जाधव, उद्धव पाटील यांनी काम पाहिले. स्पर्धेसाठी कोहिनूर चेस क्‍लबच्या सूरज ढेंबरे, सूरज फडतरे, अक्षय पिसाळ, सुजित जाधव, वैभव मार्कर, प्रदीप वाघमोडे, मयूर शिंदे, विनायक गोडसे, प्रशांत फडतरे यांनी परिश्रम घेतले. थ्री टू वन चेस अकादमीने विशेष सहकार्य केले. तायप्पा शेंडगे यांनी सूत्रसंचालन केले. सूरज फडतरे यांनी आभार मानले.

यशस्वीतांना राेख रक्कम व सन्मानचिन्ह पारिताेषिक देण्यात आले. 

स्पर्धेतील गटनिहाय विजेते असे : खुला मुख्य गट : रणवीर मोहिते (पुणे), साहिल शेजाळ (पुणे), ओंकार कडव (सातारा), आर्यन शहा (पुणे), प्रमोद माने (फलटण), उमेश कुलकर्णी (सातारा), दिपंकर कांबळे (फलटण), केतन खैरे (पुणे), नजीर काझी (फलटण), शांताराम के (चिकमंगलोर), सतीश सरोदे (बारामती), सूर्यकांत बडदे (शिरवळ), सचिन मोहिते (सातारा), युवराज दनाने (आटपाडी), संतोष रेपाळ (विटा). 
19 वर्षांखालील गट ः केवल निर्गुण (पुणे), हर्षल पाटील (जेजुरी), केयुर साखरे (सातारा), चैतन्य रणवरे (फलटण), ओंकार ओतारी (वाई), सिद्धांत बगाडे (वाई), शुभम काळे (बारामती), ऋषिकेश शिंदे (फलटण), प्रशांत लेंगारे (अकलूज), विनायक गोडसे (फलटण).
 
सात वर्षांखालील : विराज सूर्यवंशी (जामखेड), रिया सुपेकर (जामखेड), स्वराज चकोर (जामखेड), काव्या सोनवणे (जेजुरी), विनय रणसुभे (अकलूज), सहर्ष टोकले (सांगली), ईश्वरी कामठे (जेजुरी), ओंकार चव्हाण (सातारा), विवेक सणस (वाई). 

स्थानिक सात वर्षांखालील ः शिवम धायगुडे (फलटण), स्वयम चव्हाण (फलटण), श्रेयस येळे (फलटण). 

नऊ वर्षांखालील : भूवन शितोळे (पुणे), जिया शेख (सातारा), रक्षिता जाधव (सोलापूर), श्रेयस तरटे (वाई), जान्हवी सूर्यवंशी (जामखेड), आरव देवकर (जामखेड), वेदांत बराडकर (नातेपुते). 

स्थानिक नऊ वर्षांखालील ः लोकेश गांधी (फलटण).

राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबाॅल स्पर्धेत एसईएमएसला विजेतेपद
 
11 वर्षांखालील : ध्रुव गांधी (सातारा), अपूर्व देशमुख (पुणे), साहिल सूळ (फलटण), अनिकेत शिंदे (अंबरनाथ), चैत्राली जाधव (सातारा), उत्कर्ष कुलकर्णी (पुणे), सरिस्का बावळे (अकलूज), मानसी चकोर (जामखेड), श्रावणी कामठे (जेजुरी), वैष्णवी रासकर (जामखेड). 

13 वर्षांखालील : यश पंढरपुरे (सातारा), कौस्तुभ साबळे (जेजुरी), ओंकार पाटील (जेजुरी), तेजस गांधी (जामखेड), मयुरेश कुलकर्णी (सातारा), तन्वी कुलकर्णी (पुणे), प्रगती पाटील (सांगली), मित कडबाने (बारामती), सौरभ बिरामने (सासवड), सोहम मांढरे (वाई).
 
स्थानिक 13 वर्षांखालील ः सर्वेश नवले (फलटण), श्रीहरी गायकवाड (फलटण), शुभम शिंदे (फलटण).
 
15 वर्षांखालील : आयुष शिंगटे (सातारा), श्रेयस गुरसाळे (सातारा), मेहफुज पठाण (जेजुरी), असिम सय्यद (सातारा), जीवन गायकवाड (वाई), इनास शेख (सातारा), ओम नाळे (सासवड), सानिया पिसाळ (फलटण).

स्थानिक 15 वर्षांखालील ः वरद धारशिवकर (फलटण), आदित्य नलवडे (फलटण), संपदा खोपडे (फलटण). 

स्पर्धेत ' यांची ' कामगिरी ठरली सरस 

सर्वोत्कृष्ट ज्येष्ठ खेळाडू ः रामचंद्र क्षीरसागर (लोणंद). 
सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू ः संध्याराणी सस्ते-चव्हाण (फलटण). 
सर्वोत्कृष्ट युवती खेळाडू ः अहंती कदम (मेढा). 
सर्वोत्कृष्ट अनरेटेड खेळाडू ः दीपक क्षीरसागर (लोणंद) 
सर्वोत्कृष्ट स्थानिक खेळाडू (फलटण तालुका) ः शुभम कांबळे (फलटण).

राष्ट्रीय शालेय स्पर्धेसाठी राज्य बेसबाॅल संघ जाहीर


​ ​

संबंधित बातम्या