क्रिकेटविषयक कारणामुळेच मितालीला वगळले : पोवार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 November 2018

मिताली राजबरोबरचे संघातील नाते अलिप्त होते; परंतु ेट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात तिला केवळ क्रिकेटविषयक कारणामुळेच वगळण्यात आल्याचे स्पष्टीकरण प्रशिक्षक रमेश पोवार यांनी दिल्याचे बीसीसीआय पदाधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई : मिताली राजबरोबरचे संघातील नाते अलिप्त होते; परंतु ेट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात तिला केवळ क्रिकेटविषयक कारणामुळेच वगळण्यात आल्याचे स्पष्टीकरण प्रशिक्षक रमेश पोवार यांनी दिल्याचे बीसीसीआय पदाधिकाऱ्याने सांगितले.

मिताली राजच्या आरोपानंतर पोवार यांनी आज बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी आणि क्रिकेट व्यवस्थापक साबा करिम यांची भेट घेतली आणि स्पष्टीकरण दिले. मिताली नेहमीच अलिप्त राहायची आणि तिला सांभाळणे फारच कठीण असायचे, असे पोवार यांनी सांगितल्याचे कळते.

मुळात विजयी संघात बदल करायचा नव्हता आणि त्यात मितालीचा स्ट्राईक रेट चांगला नव्हता, या दोन कारणांमुळे तिला इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात संधी देण्यात आली नाही, असे पोवार यांनी सांगितले, परंतु आयर्लंड आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात स्ट्राईक रेटचा मुद्दा विचारात घेतला होता का? या प्रश्‍नावर मात्र पोवार उत्तर देऊ शकले नाहीत. या दोन्ही सामन्यांत मितालीने अर्धशतके केली होती.

मितालीला वगळण्यासाठी कोणाचा दबाव होता का? या प्रश्‍नावर पोवार यांनी अशा प्रकारे मला कोणताही फोन कॉल आलेला नव्हता, परंतु संघ व्यवस्थापक (तृप्ती भट्टाचार्य) आणि निवड समितीच्या सदस्या (सुधा शहा) यांच्याशी बीसीसीआयमधील एक ताकदवर व्यक्ती संपर्कात होती. याची आपल्याला माहिती असल्याचे पोवार म्हणाल्याचे बीसीसीआयचा हा अधिकारी म्हणाला.

संबंधित बातम्या