रैनाने उलगडले सात नंबर जर्सीला साथ देण्यामागचे गुपित

सुशांत जाधव
Monday, 17 August 2020

निवृत्तीसंदर्भातील निर्णय अचानकपणे नाही तर विचार करुन घेतला आहे, असे सुरेश रैनाने एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केले.

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने स्वातंत्र्य दिनी एकाच दिवशी निवृत्तीची घोषणा केली. दोघांनी एकाच दिवशी निवृत्ती घेतल्यानंतर त्यांच्या मैत्रीचे दाखले देण्यास सुरुवात झाली. धोनीने प्रसार माध्यमांपासून दूर राहण्यासाठी 15 ऑगस्ट या दिवशी निवृत्तीची घोषणा केल्याची चर्चाही रंगली. धोनीसोबतच्या घनिष्ठ मैत्रीमुळे रैनानेही त्याच दिवशी निवृत्ती घेतल्याचे बोलले गेले. पण आता खुद्द रैनाने 15 ऑगस्ट हा दिवस निवृत्तीची घोषणा करण्यासाठी का निवडला यामागचे रहस्य उलगडले आहे. 

'निवृत्तीच्या घोषनेनंतर दोघे गळ्यात-गळा घालून खूप रडलो'

निवृत्तीसंदर्भातील निर्णय अचानकपणे नाही तर विचार करुन घेतला आहे, असे सुरेश रैनाने एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केले. धोनी हा 7 क्रमांकाच्या जर्सीत तर स्वत: 3 क्रमांकाच्या जर्सीत मैदानात उतरायचो. आमच्या दोघांच्या जर्सीस क्रमांक एकत्रिक केल्यानंतर  73 हा आकडा दिसतो. भारताला स्वातंत्र्य मिळून 73 वर्षे पूर्ण झाली. निवृत्तीसाठी यासारखा क्षण दुसरा नव्हता. हे कॅलक्युलेशन करुन आम्ही स्वातंत्र्य दिनी निवृत्तीची घोषणा केली, असे रैनाने म्हटले आहे. 

CPL2020 : कॅरेबियन लीगमध्ये धावांची 'बरसात' करणारे आघाडीचे 5 फलंदाज!

रैना पुढे म्हणाला, 23 डिसेंबर 2004 मध्ये बांगलादेश विरुद्धच्या सामन्याने धोनीने आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 30 जूलै 2005 मध्ये मी श्रीलंकेच्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. राष्ट्रीय संघात आम्ही बराच काळ एकत्र खेळलो. त्यानंतर आम्ही एकत्रित निवृत्ती घेतली. आयपीएलमध्येही आम्ही सोबत खेळलो आणि खेळत राहिन, असेही रैनाने यावेळी सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या