टीम इंडियासाठी तयार होतोय 'The Wall Jr'

वृत्तसंस्था
Saturday, 21 December 2019

कर्नाटकातील 14 वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय 11 सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने 201 धावांची खेळी केली. त्याने 256 चेंडूत 11 चौकारांसह 201 धावा केल्या. 

बंगळूर : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड म्हणजे टीम इंडियाची 'The Wall.'  त्याच्या फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने अनेकवेळा भक्कम धावसंख्या उभी केली. त्याच्याच पावलावर पाऊल टाकत त्याचा मुलगा समित द्रविड टीम इंडियासाठी नवीन The Wall होण्याच्या तयारीत आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कर्नाटकातील 14 वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय 11 सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने 201 धावांची खेळी केली. त्याने 256 चेंडूत 11 चौकारांसह 201 धावा केल्या. 

INDvsWI : अंतिम सामन्याआधी टीम इंडिया करतीये अशी मजा, बघा फोटो!

या सामन्यात त्याने अष्टपैलू कामगिरी केली आहे. दुसऱ्या डावात त्याने नाबाद 94 धावा केल्या तसेच गोलंदाजीतही 26 धावा देत तीन बळी घेतले आहेत. यापूर्वी त्याने 2018मध्ये राज्सयस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत आपल्या शाळेकडून खेळताना 150 धावा केल्या होत्या. 

​ ​

संबंधित बातम्या