धोनीसारखं मला कधीच जमलं नाही: राहुल द्रविड

टीम ई-सकाळ
Friday, 12 June 2020

धोनीमध्ये जी क्षमता होती ती माझ्यापेक्षा सरस होती, असेच द्रविड यांनी आपल्या वक्तव्यातून म्हटले आहे.  

मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याच्या घडीला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची प्रमुख धूरा सांभाळणाऱ्या राहुल द्रविड यांनी महेंद्रसिंह धोनीवर कौतुकाचा वर्षाव केलाय. धोनी हा कोणतीही परवा न करता खेळायचा आणि ही त्याच्या कौशल्यातील एक प्रमुख झलक होती, असे द्रविड यांनी म्हटले आहे. आपल्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या धोनीतील हे कौशल्य माझ्यात कधीच नव्हते, असेही द्रविड यांनी म्हटले आहे. धोनीमध्ये जी क्षमता होती ती माझ्यापेक्षा सरस होती, असेच द्रविड यांनी आपल्या वक्तव्यातून म्हटले आहे.  

IPL बाबत दादा ठाम; आर्थिक संकटावर मात करण्यासाठी असा असू शकेल 'गेम_प्लॅन'

माजी क्रिकेटर संजय मांजरेकर यांच्यासोबत ESPNCricinfo मध्ये संवाद साधताना द्रविड यांनी क्रिकेटमधील अनेक घटनांना उजाळा दिला. यावेळी त्यांनी आपल्यासोबतच्या सहकाऱ्यांविषयचीच्या काही खास गोष्टी शेअर केल्या. महेंद्रसिंग धोनी अखेरच्या क्षणात जेव्हा खेळायचा तेव्हा तो स्वत:साठी काहीतरी खास करत आहे, असे वाटायचे. त्याला निकालाची काही परवा नाही, असेच त्याच्याकडे पाहताना वाटायचे, अशा शब्दांत त्यांनी धोनीच्या फिनिशिंग मुव्हमेंटला उजाळा दिला.

विराट ब्रिगेड या दौऱ्यासाठी सज्ज; सरकारी परवान्याची प्रतिक्षा

धोनीच्या कौशल्याबाबत द्रविड पुढे म्हणाले की, अशी क्षमता स्वत: विकसित करावी लागते. ती ताकद माझ्यात कधीच नव्हती. प्रत्येक निर्णयाचा परिणाम काय असेल याला मी महत्त्व द्यायचो. धोनीची स्टाईल याच्या विपरित होती. धोनी कधीच निकालाची परवा करायचा नाही. तो आपला नैसर्गिक खेळ दाखवायचा. हेच त्याच्यातील अभूतपूर्व कौशल्य असल्याचे वाटते.  

जाफरने अनमोल सेहवागकडे केला कानाडोळा; भज्जी म्हणाला असं का? 

2006 मध्ये महेंद्रसिंह धोनीने राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली विशेष कामगिरी बजावली होती. पाच सामन्यांची ही मालिका भारताने 4-1 अशी जिंकली होती. यावेळी युवराज सिंग आणि महेंद्रसिंह  धोनी यांनी मोलाचे योगदान दिले होते. या मालिकेतील खेळीने धोनीची गणना ही फिनिशरमध्ये केली जाऊ लागली. 2007 मधील विश्वचषकातील पराभवानंतर राहुल द्रविड यांनी भारतीय संघाचे नेतृत्व सोडले. त्यानंतर कर्णधारपदाची माळ ही धोनीच्या गळ्यात पडली होती. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिली टी-20 विश्वचषक स्पर्धा गाजवली होती.     
 


​ ​

संबंधित बातम्या