Asian Games 2018 : स्वप्नाच्या सोनेरी स्वप्नात द्रविडचाही वाटा

वृत्तसंस्था
Friday, 31 August 2018

सलग दोन दिवसांपासून डाव्या जबड्याला प्रचंड वेदना होत असतानाही स्वप्ना बर्मन हिने महिलांच्या हेप्टथलाॅनमध्ये सुवर्ण पदक पटकावले. हेप्टथलॉनमध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या स्वप्ना बर्मन हिच्या प्रवासात माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडचाही वाटा आहे. 'The Rahul Dravid Athlete Mentorship Programme' अंतर्गत तिला राहुल द्रविडचा पाठिंबा मिळाला. 

जकार्ता : सलग दोन दिवसांपासून डाव्या जबड्याला प्रचंड वेदना होत असतानाही स्वप्ना बर्मन हिने महिलांच्या हेप्टथलाॅनमध्ये सुवर्ण पदक पटकावले. हेप्टथलॉनमध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या स्वप्ना बर्मन हिच्या प्रवासात माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडचाही वाटा आहे. 'The Rahul Dravid Athlete Mentorship Programme' अंतर्गत तिला राहुल द्रविडचा पाठिंबा मिळाला. 

2017-18मध्ये 'Go Sports Foundation' तर्फे 20 एथलिट्सची निवड करण्याती आली होती. या सर्व एथलिट्सना 18व्या आशियाई क्रीडा स्पर्धा आणि 2020मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धांसाठी सर्व मदत पुरवण्याची सोय करण्यात आली होती. तिच्यासह अजून 19 खेळाडूंना द्रविडच्या या प्रोगामअंतर्गत आर्थिक मदत आणि मार्गदर्शन देण्यात आले. 

स्वप्नाच्या या कामगिरीमुळे तिला पश्चिम बंगाल सरकारकडून 10 लाख आणि सरकारी नोकरी दोण्यात आला आहे. द्रविडने यापूर्वी 19 वर्षांखालील क्रिकेट संघाशिवायही अनेक खेळाडूंना मदत आणि मार्गदर्शन केले आहे. दत्तू भोकनळ, साई प्रणित, हार्दिक पंड्या, किदंबी श्रीकांत, अंजुम मुगदिल अशा अनेक खेळाडूंना त्याने मार्गदर्शन केले आहे.  


​ ​

संबंधित बातम्या