दादाचे राज असूनही द्रविडवर होणार आणखी सुनावणी

वृत्तसंस्था
Friday, 1 November 2019

 परस्परविरोधी हितसंबंधांच्या मुद्द्यावरील वादंग सौरव गांगुली भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष झाल्यावरही थांबण्यास तयार नाही. भारतीय मंडळाचे लोकपाल डी. के. जैन यांनी राहुल द्रविडला याच आरोपासंदर्भात सुनावणीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. ही सुनावणी 12 नोव्हेंबरला होईल. 

मुंबई : परस्परविरोधी हितसंबंधांच्या मुद्द्यावरील वादंग सौरव गांगुली भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष झाल्यावरही थांबण्यास तयार नाही. भारतीय मंडळाचे लोकपाल डी. के. जैन यांनी राहुल द्रविडला याच आरोपासंदर्भात सुनावणीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. ही सुनावणी 12 नोव्हेंबरला होईल.

माझं नाव घ्यायची काहीच गरज नव्हती; अनुष्का भडकल्यावर फारुखांची माफी

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक असलेल्या द्रविडकडून परस्परविरोधी हितसंबंधांच्या नियमाचा भंग होत असल्याचा आरोप झाला आहे. यासंदर्भात 26 सप्टेंबरला सुनावणी झाली होती. आता याबाबत पुन्हा सुनावणी होईल. द्रविड एकाच वेळी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख तसेच इंडिया सिमेंटस्‌मध्ये उपाध्यक्ष आहे. इंडिया सिमेंटस्‌कडे चेन्नई सुपर किंग्जची मालकी आहे, असे म्हटले जात आहे. 

आपण इंडिया सिमेंटस्‌मधून रजा घेतली आहे, तसेच चेन्नई सुपर किंग्जशी आपला कोणताही संबंध नसल्याचे द्रविड यांनी यापूर्वीच सांगितले आहे. सप्टेंबरमध्ये सुनावणी झाली, त्या वेळी प्रशासकीय समितीकडे मंडळाचा कारभार होता. द्रविडला त्या वेळी नोटीस देण्यात आल्यावर आता देवच भारतीय क्रिकेटला वाचवू शकतो, अशी टिप्पणी केली होती. आता गांगुली अध्यक्ष असतानाही ही नोटीस आली आहे. परस्परविरोधी हितसंबंधांच्या नियमाचा फटका क्रिकेटपटूंना बसू नये यासाठी प्रशासक समितीने घटनेत बदल सुचवला आहे.


​ ​

संबंधित बातम्या