Asia Cup 2018 : अफगाणिस्तानपासूनच भारताला धोका : द्रविड

वृत्तसंस्था
Saturday, 22 September 2018

आशिया करंडकात भारतीय संघाने दोन्ही सामन्यात विजय मिळवला असला तरीही भारताने अफगाणिस्तानला कमी न लेखण्याचा सल्ला, भारत अ आणि 19 वर्षांखालील भारतीय संघाचा मार्गदर्शक राहुल द्रविड याने भारतीय संघातील खेळाडूंना दिला आहे. 

दुबई : आशिया करंडकात भारतीय संघाने दोन्ही सामन्यात विजय मिळवला असला तरीही भारताने अफगाणिस्तानला कमी न लेखण्याचा सल्ला, भारत अ आणि 19 वर्षांखालील भारतीय संघाचा मार्गदर्शक राहुल द्रविड याने भारतीय संघातील खेळाडूंना दिला आहे. 

भारतीय संघाने फक्त पाकिस्तानच्या संघावर लक्ष न देता इतर संघांवरही लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला त्याने दिला. तो म्हणाला, ''अफगाणिस्तानचा संघ उत्तम कामगिरी करत आहे. आपण फक्त पाकिस्तानच्या संघावर का लक्ष केंद्रीत करत आहोत हे मला समजले नाही. मी संघातील एक खेळाडू असतो तर मी कधीच फक्त पाकिस्तानवर लक्ष केंद्रीत केले नसते. भारतीय संघ चांगला खेळ करत असला तरी काळजी घेणे आवश्यक आहे.''

अफगाणिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही संघांने उत्कृष्ट कामगिरी केली असल्याने दोन्ही संघांपासून सावध राहण्याची गरज आहे. 
अफगाणिस्तानचा संघाने साखळातील दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकले आहेत. त्यांच्या फलंदाजीत प्रचंड ताकद असून गोलंदाजीत त्यांच्याकडे राशिद खान हा हुकमी एक्का आहे त्यामुळेच भारतीय संघाने त्यांच्यापासून सावध रहावे असा सल्ला राहुलने दिला आहे.

संबंधित बातम्या