शास्त्रींना द्रविडचेही वावडे, गांगुलीचा गौप्यस्फोट

वृत्तसंस्था
Thursday, 6 September 2018

नवी दिल्ली : इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय क्रिकेट संघाची कामगिरी आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री
हा सध्याचा सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. भारतीय संघाच्या असमाधानकारक कामगिरीनंतर मार्गदर्शक म्हणून रवी शास्त्रींवर सर्वाधिक टीका केली जात आहे. अशातच संघाच्या फलंदाज सल्लागाराची जबाबदारी राहुल द्रविडकडे सापवण्यात आली होती मात्र शास्त्रींशी झालेल्या चर्चेनंतर त्याने नकार दिल्याचा गौप्यस्फोट भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने केला आहे. 

''क्रिकेट सल्लागार समिती आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI ) यांनी संघाचा फलंदाज सल्लागार म्हणून राहुल द्रविडची निवड केली होती. मात्र शास्त्रींशी बंद खोलीत झालेल्या चर्चेनंतर द्रविडने ही जबाबदारी नाकारली," असे गांगुलीने स्पष्ट केले आहे. गांगुलीने केलेल्या या गौप्यस्फोटामुळे शास्त्री विरोधकांच्या हातात आयते कोलित मिळाले आहे. 

शास्त्री यांची संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करताना खूप मोठा वाद झाला होता. माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांना त्यावेळी प्रशिक्षकपदावरुन  हटवण्यासाठी राजकारण झाल्याच्या चर्चाही रंगल्या. त्याचवेळी सचिन तेंडुलकर, गांगुली आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्या सल्लागार समितीने फलंदाजांना सल्लागार म्हणून द्रविड, तर गोलंदाज सल्लागार म्हणून झहीर खानचे नाव सुचवले होते. मात्र, या पदांसाठी अनुक्रमे संजय बांगर आणि भारत अरुण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. 

​ ​

संबंधित बातम्या