या मतचाचणीत सचिनपेक्षा द्रविडला मिळाली अधिक पसंती

टीम ई-सकाळ
Thursday, 25 June 2020

ब्रँड व्हॅल्यू असो वा प्रायोजकां रांग असो...सचिनच सर्वात पुढे असायचा. पण सचिन एवढाच प्रतिभावंत असा एक खेळाडू आहे ज्याने सचिनला मागे टाकले आहे.

नवी दिल्ली : सर्वाधिक कसोटी, सर्वाधिक शतके...असे एक ना अनेक सर्वाधिक विक्रम करणारा सचिन तेंडुलकर अर्थातच सर्वांच्या गळ्यातील ताईत आहे. ब्रँड व्हॅल्यू असो वा प्रायोजकां रांग असो...सचिनच सर्वात पुढे असायचा. पण सचिन एवढाच प्रतिभावंत असा एक खेळाडू आहे ज्याने सचिनला मागे टाकले आहे. वाचून विश्वास बसला नाही ना...होय हे सत्य आहे. तो खेळाडू आहे राहुल द्रविड !! सचिन तेंडुलकरचे अब्जावधी चाहते असल्यामुळे काही त्याला क्रिकेटेश्वर म्हणतात, पण आता विस्डेन इंडियाने घेतलेल्या चाहत्यांच्या मतचाचणीत राहुल द्रविडने तेंडुलकरला मागे टाकले आहे. 

#क्रिकेट_डायरी : या पाच भारतीय फलंदाजांनी पहिल्या ODI शतकासाठी खूप वेळ घेतला! 

फेसबुकच्या माध्यमातून घेतलेल्या या जनमत चाचणीत द्रविडला 52 टक्के चाहत्यांनी पसंती दिली. त्यांना 11 हजार 400 मते मिळाली. तेंडुलकरला 48 टक्के चाहत्यांची पसंती लाभली. खरे तर या चाचणीची सांगता मंगळवारी होणार होती. त्या दिवशी द्रविडला 42 टक्के पसंती होती; पण अखेरच्या दिवशी द्रविडने चांगलीच जिगर दाखवली आणि तेंडुलकरला मागे टाकले. दरम्यान, तिसऱ्या क्रमांकाच्या स्पर्धेत गावसकर यांनी विराट कोहलीस मागे टाकले. 

आता भारतीय क्रिकेट संघातील या खेळाडूने सुरु केले सराव

विस्डेन इंडियाने सुरुवातीस सोळा भारतीय फलंदाजांची निवड केली होती. त्यातून अंतिम स्पर्धेसाठी राहुल द्रविड विरुद्ध सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकर विरुद्ध विराट कोहली अशी स्पर्धा झाली. सचिन तेंडुलकर असो वा महेंद्रसिंग धोनी असो किंवा आत्ता विराट कोहली असो. राहुल द्रविडला त्याने भारतीय क्रिकेटला दिलेल्या योगदानाचे महत्व कधीच मिळाले नाही, असे माजी खेळाडू गौतम गंभीरने काही दिवसांपूर्वीच म्हटले होते.


​ ​

संबंधित बातम्या