द्रविडच्या शब्दा-खातरच सचिन-गांगुली जोडगोळीनं घेतली होती माघार

टीम ई-सकाळ
Tuesday, 30 June 2020

या विश्वचषकात युवांना संधी देण्यासाठी आपण माघार घ्यायला हवी, अशी भूमिका राहुल द्रविड याची होती. त्यानेच  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांना टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळू नये, असे सांगितले होते.

नवी दिल्ली : 2007 मध्ये झालेल्या मर्यादित षटकांच्या विश्वषकात राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर याच वर्षी झालेल्या पहिल्या टी-20 विश्वचषकापूर्वी दिलीप वेंगसरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने महेंद्र सिंह धोनीची कर्णधारपदी नियुक्ती करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ युवांनी भरलेला होता.  या संघात विरेंद्र सेहवागचाही समावेश होता. त्याने पहिल्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व त्याच्या खांद्यावर देण्यात येईल, अशी चर्चाही क्रिकेट वर्तुळात त्यावेळी रंगली. धोनीशिवाय युवीकडे चांगला अनुभव होता. पण निवड समितीने धोनीची निवड केली. अन् धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने क्रिकेटच्या मैदानात नवा इतिहास रचला.  

बीसीसीआयला विस्मरण झाले की काय? कधी होणार विवोची गच्छंती...

या विश्वचषकात युवांना संधी देण्यासाठी आपण माघार घ्यायला हवी, अशी भूमिका राहुल द्रविड याची होती. त्यानेच  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांना टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळू नये, असे सांगितले होते.  सचिन- गांगुली पहिल्या टी-20 विश्वचषकात दिसले नाहीत याचे कारण राहुल द्रविडने मांडलेली भूमिका होती, असा दावा  तत्कालीन भारतीय संघाचे व्यवस्थापक असणाऱ्या लालचंद राजपूत यांनी केला आहे.  राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये प्रत्येकी एक-एक टी-20 सामना खेळला. गांगुलीने एकही टी-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले नाही.  

क्रिकेटच्या मैदानातील 'हे' लाजिरवाणे रेकॉर्ड तुम्हाला माहित आहेत का?

धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिला वहिला टी-20 विश्वचषक उंचावला. या ऐतिहासिक विजयानंतर धोनीच्या खांद्यावर भारतीय एकदिवसीय संघाची जबाबदारी देण्यात आली. कुंबळे यांनी निवृत्ती घेतल्यानंतर कसोटी संघाचे नेतृत्वही धोनीकडे सोपवण्यात आले. 2011 मध्ये  धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषक जिंकला. या संघात सचिन-गांगुली-द्रविड या त्रिदेवापैकी एकमव सचिनच संघात होता.  


​ ​

संबंधित बातम्या