राहुलचे द्रविडच्या पावलावर पाऊल

वृत्तसंस्था
Sunday, 2 September 2018

भारताचा सलामीवीर लोकेश राहुलने राहुल द्रविडच्या पावलावर पाऊल ठेवत स्लिपमध्ये क्षेत्ररक्षणीत आपली छाप पाडली आहे. राहुलने तिसऱ्या कसोटी सामन्यात तब्बल सात झेल पकडले होते. त्याच्या याच कामगिरीमुळे त्याने एकाच मालिकेत सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळविले आहे.   

लंडन : भारताचा सलामीवीर लोकेश राहुलने राहुल द्रविडच्या पावलावर पाऊल ठेवत स्लिपमध्ये क्षेत्ररक्षणीत आपली छाप पाडली आहे. राहुलने तिसऱ्या कसोटी सामन्यात तब्बल सात झेल पकडले होते. त्याच्या याच कामगिरीमुळे त्याने एकाच मालिकेत सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळविले आहे.   

एकाच मालिकेत सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत राहुल तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने सध्या सुरु असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत 11 झेल पकडले आहेत. या यादीत कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा सर्वकालीन सर्वोत्तम क्षेत्ररक्षक अशी ओळख असलेला राहुल द्रविड या यादीत प्रथम स्थानावर आहे. त्याने 2004मध्ये ऑस्टेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत 13 झेल पकडले आहेत. या यादीत एकनाथ सोलकर 12 झेलांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी 1972-73मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत 12 झेल घेतले होते.

भारतीय संघाला फार पूर्वीपासून स्लिपमध्ये उत्तम झेल पकडणारे क्षेत्ररक्षक लाभले आहेत. एकनाथ सोलकर, महंम्मद अझरुद्दिन, राहुल द्रविड, व्हि व्हि एस लक्ष्मण, अजिंक्य रहाणे यांसारखे एकापेक्षा एक सरस क्षेत्ररक्षकांनी कसोटीमध्ये भारताला विजय मिळवून दिले आहेत. 

मूळचा क्षेत्ररक्षक असल्याने राहुलने फार अत्यंत शिताफीने स्लिपमधील सर्व झेल पकडले आहेत. द्रविड, रहाणे, अझरुद्दीन या सर्व क्षेत्ररक्षकांमध्ये आता लोकेश राहुलचेही नाव जोडले गेले आहे.


​ ​

संबंधित बातम्या