वेडा आहेस का? 150 किलो वजन घेऊन खेळतो; विंडीज बोर्डाची तंबी

वृत्तसंस्था
Tuesday, 13 August 2019

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेत विंडीजच्या संघात चक्क 6.8 उंच आणि 150 किलोपेक्षा जास्त वजन असलेल्या रहकीम कॉर्नवॉलला स्थान देण्यात आले आहे. आता मात्र विंडीज क्रिकेट बोर्डाने आता युटर्न घेतला आहे. त्यांनी रहकीम आता वजन कमी करणार असल्याचे सांगितले आहे. 

गयाना : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेत विंडीजच्या संघात चक्क 6.8 उंच आणि 150 किलोपेक्षा जास्त वजन असलेल्या रहकीम कॉर्नवॉलला स्थान देण्यात आले आहे. आता मात्र विंडीज क्रिकेट बोर्डाने आता युटर्न घेतला आहे. त्यांनी रहकीम आता वजन कमी करणार असल्याचे सांगितले आहे. 

ही माहिती विंडीज क्रिकेट मंडळाचे प्रमुख रिकी स्केरिट यांनी दिली. ते म्हणाले, ''26 वर्षीय कॉर्नवॉल वजन कमी करणार आहे. विंडीज क्रिकेट मंडळाच्या प्रशिक्षणाच्या मार्गदर्शनाखाळी कॉर्नवॉल वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणार आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याने 17 वेळा पाच विकेट्स आणि 2 वेळा दहा विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. भारत अ विरुद्धच्या सामन्यातही त्याची कामगिरी उल्लेखनीय झाली होती.''   

6.8 फूट उंच अन् 150 किलोचा पैलवान भिडणार भारतीयांना

रहकीमला अखेर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळत आहे. त्याची पहिली झलक तुम्ही नक्कीच फार काळ लक्षात ठेवाल. त्याची उंची 6.8 फूट आहे तर त्याचे वजन 150 किलोपेक्षा जास्त आहे. तो नक्कीच सर्वांत तंदुरुस्त खेळाडू नाही मात्र, त्याच्या अफाट ताकदीमुळे तो लांबच लांब फटके खेचतो आणि हीच त्याची खरी ताकद आहे. 

संबंधित बातम्या