US Open 2019 : नदाल विरुद्ध मेदवेदेव महामुकाबला

वृत्तसंस्था
Saturday, 7 September 2019

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या विजेतेदासाठी स्पेनचा रॅफेल नदाल आणि रशियाचा डॅनील मेदवेदेव यांच्यात महामुकाबला होईल.

न्यूयॉर्क : अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या विजेतेदासाठी स्पेनचा रॅफेल नदाल आणि रशियाचा डॅनील मेदवेदेव यांच्यात महामुकाबला होईल.

दोघांनी उपांत्य फेरीत तीन सेटमध्ये बाजी मारत उच्च दर्जाचा फॉर्म प्रदर्शित केला. दोघांना पहिल्या सेटमध्ये टायब्रेकपर्यंत संघर्ष करावा लागला.

द्वितीय मानंकित नदालने इटलीचा धडाकेबाज आव्हानवीर मॅट्टीओ बेर्रेट्टिनी याचे आव्हान 7-6 (8-6),6-4, 6-1 असे परतावून लावले. पहिल्या सेटमध्ये नदालने दोन सेटपॉइंट वाचविले.

पाचवे मानांकन असलेल्या मेदवेदेवने बल्गेरियाच्या ग्रिगॉर दिमीत्रोव याच्यावर 7-6 (7-5), 6-4, 6-3 असा विजय संपादन केला.

सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आहे, तर रॉजर फेडरर याचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. अशावेळी फेडररच्या 20 ग्रँड स्लॅम विजेतेपदांच्या उच्चांकाच्या आणखी जवळ जाण्याची सुवर्णसंधी नदालला आहे. नदालच्या खात्यात 18 ग्रँड स्लॅम करंडक आहेत.


​ ​

संबंधित बातम्या