US Open : जिगरबाज नदालचा पाच तास झुंजून विजय

वृत्तसंस्था
Wednesday, 5 September 2018

स्पेनचा अव्वल टेनिसपटू रॅफेल नदालने अमेरिकन ओपन स्पर्धेत जिगरबाज खेळी करत ऑस्ट्रियाच्या डॉमिनीक थिएमवर विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. त्याने डॉमिनिकवर टायब्रेकमध्ये 0-6, 6-4, 7-5, 6-7(4/7), 7-6(7/5) असा विजय मिळवला. 

न्युयॉर्क : स्पेनचा अव्वल टेनिसपटू रॅफेल नदालने अमेरिकन ओपन स्पर्धेत जिगरबाज खेळी करत ऑस्ट्रियाच्या डॉमिनीक थिएमवर विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. त्याने डॉमिनिकवर टायब्रेकमध्ये 0-6, 6-4, 7-5, 6-7(4/7), 7-6(7/5) असा विजय मिळवला. 

रॉजर फेडररच्या धक्कादायक पराभवानंतर अमेरिकन ओपन स्पर्धेत चाहत्यांना बुधवारी आणखी एका चुरशीचा सामना अनुभवायला मिळाला. हा सामना यंदाच्या अमेरिकन ओपन स्पर्धेत सर्वाधिक वेळ चालला.  

हा सामना तब्बल 4 तास 50 मिनिटे चालला. या सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या नदलला डॉमिनिकने पहिल्या सेटमध्ये पराभवाचा धक्का दिला. त्याने पहिला सेट 6-0 अशा फरकाने जिंकला. त्यानंतर मात्र नदालने पुढाल दोन सेट जिंकत जोरदार पुनरागमन केले. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेला थिएमने तरीही हार मानली नाही. त्याने प्रतिकार करत चौथा सेट जिंकत सामन्यातील रंगत वाढवली. पाचवा सेटही टायब्रेकमध्ये गेल्यावर चाहत्यांमध्ये तणाव वाढला मात्र नदालने आपल्या जोरदार खेळाच्या जोरावर सामन्यात विजय मिळवला. 

''मी डॉमिनिकला म्हणालो, की मला तुझ्याबद्दल फार वाईट वाटते आहे. परंतू तु तुझी कामगिरी सुरु ठेव. डॉमिनिकला जिंकण्याच्या भविष्यात अजून खूप संधी मिळणार आहेत.''

- रॅफेल नदाल  

त्यापूर्वी, महिला एकेरीत अमेरिकेच्या सेरेना विल्यम्स आणि लॅटव्हियाची अनास्तासिया सेव्हास्तोव्हा यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. सेरेनाने 1 तास 26 मिनिटांत चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हाचा 6-4, 6-3 असा पराभव केला, तर सेव्हास्तोव्हाने अमेरिकेच्या स्लोआन स्टिफन्सचा 6-2, 6-3 असा पराभव केला.

 


​ ​

संबंधित बातम्या