इटालियन मास्टर्स टेनिस : जोकोविचला हरवून नदाल विजेता

वृत्तसंस्था
Tuesday, 21 May 2019

जोकोविचने उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोट्रोविरुद्ध दोन मॅचपॉइंट वाचविले होते. स्थानिक वेळेनुसार तो सामना मध्यरात्री एक वाजून 5 मिनिटांनी संपला होता. त्यानंतर दिएगो श्‍वार्टझमन याच्याविरुद्धही त्याला तीन सेटमध्ये दोन तास 31 मिनिटे झुंज द्यावी लागली होती. या दोन खडतर लढतींनंतर तो नदालविरुद्ध नेहमीच्या ताकदीने खेळू शकला नसावा. 

रोम : स्पेनचा टेनिसपटू रॅफेल नदाल याने इटालियन एटीपी मास्टर्स टेनिस स्पर्धेत विजेतेपद संपादन केले. त्याने अंतिम सामन्यात सर्बियाचा आव्हानवीर नोव्हाक जोकोविच याला 6-0, 4-6, 6-1 असे पराभूत केले. पुढील महिन्यात 33 वर्षांचा होणाऱ्या नदालने या कामगिरीबरोबरच आगामी फ्रेंच ओपनसाठी आपले आव्हान भक्कम असेल, असा इशारा दिला आहे. 

पहिला सेट नदालने 39 मिनिटांतच "लव्ह'ने जिंकला. त्यानंतर जोकोविचने कडवी झुंज दिली. त्यामुळे सामना एकूण दोन तास 25 मिनिटे चालला. यात निर्णायक सेट एका गेमच्या मोबदल्यात जिंकत नदालने क्‍ले कोर्टवरील वर्चस्व अधोरेखित केले. 
नदालला ऑस्ट्रेलियन ओपन या मोसमातील पहिल्या ग्रॅंडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जोकोविचने हरविले होते. गेल्या चार स्पर्धांत नदाल उपांत्य फेरीत हरला होता. त्या पार्श्‍वभूमीवर हे विजेतेपद त्याच्यासाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी सुखद ठरले. 

जोकोविचने उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोट्रोविरुद्ध दोन मॅचपॉइंट वाचविले होते. स्थानिक वेळेनुसार तो सामना मध्यरात्री एक वाजून 5 मिनिटांनी संपला होता. त्यानंतर दिएगो श्‍वार्टझमन याच्याविरुद्धही त्याला तीन सेटमध्ये दोन तास 31 मिनिटे झुंज द्यावी लागली होती. या दोन खडतर लढतींनंतर तो नदालविरुद्ध नेहमीच्या ताकदीने खेळू शकला नसावा. 

- कारकिर्दीत क्‍ले कोर्टवरील 58वे विजेतेपद 
दृष्टिक्षेपात 
- इटालियन स्पर्धेत नदाल नवव्यांदा विजेता 
- मोसमातील पहिलेवहिले विजेतेपद 
- कारकिर्दीतील एकूण 81वे विजेतेपद 
- मास्टर्स 1000 मालिकेतील स्पर्धांत जोकोविचविरुद्ध 34 विजय-33 पराभव अशी कामगिरी 
- 2005 पासून नदाल 2015चा अपवाद वगळता मास्टर्स मालिकेतील किमान एका स्पर्धेत विजेता 
- मास्टर्स मालिकेतील एकूण 34वे विजेतेपद 
- जोकोविचविरुद्ध 54 सामन्यांत 26 विजय-28 पराभव अशी कामगिरी 
- उभय प्रतिस्पर्ध्यांतील 141 सेटनंतर प्रथमच 6-0 अशा स्कोअरची नोंद 
- क्‍ले कोर्टवर 17 विजय-7 पराभव असे वर्चस्व 

​ ​

संबंधित बातम्या