#वर्णभेदाचा_खेळ : साहेबांच्या ताफ्यातील हा प्रतिभावंत खेळाडूही दुखावलाय

टीम ई-सकाळ
Friday, 5 June 2020

वर्णभेदाचा मुद्दा बहुतांश फुटबॉलच्या खेळात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळायचा मात्र अन्य खेळाची मैदानेही या वादग्रस्त मुद्यातून सुटलेली नाहीत. #वर्णभेदाचा_खेळ या लेख मालिकेतून आपण कोणत्या खेळाडूला कशा प्रकारे वर्णभेदाचा सामना करावा लागला यावर एक नजर टाकणार आहोत. 

पुणे : कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉयड (George Floyd) यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेसह इतर देशात वर्णद्वेषाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. वेस्ट इंडिजचा धडधाकड फलंदाज क्रिस गेलने फुटबॉलच्या मैदानातच नव्हे तर क्रिकेटच्या मैदानातही वर्णभेद केला जातो, असा खुलासा नुकताच केला. त्यानंतर क्रीडा जगतातून अनेक प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली.  वर्णभेदाचा मुद्दा बहुतांश फुटबॉलच्या खेळात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळायचा मात्र अन्य खेळाची मैदानेही या वादग्रस्त मुद्यातून सुटलेली नाहीत. #वर्णभेदाचा_खेळ या लेख मालिकेतून आपण कोणत्या खेळाडूला कशा प्रकारे वर्णभेदाचा सामना करावा लागला यावर एक नजर टाकणार आहोत. 

वर्णभेदाच्या मुद्यावर केएल राहुलने शेअर केली भावनिक पोस्ट

इंग्लंड ताफ्यातील युवा गोलंदाज जोफ्रा आर्चर याला न्यूझीलंड दौऱ्यावर वर्णभेदावरुन डिवचण्याचा प्रकार घडला. क्रिकेटच्या मैदानात घडलेले हे ताजे प्रकरण आहे. जोफ्रा आर्चर हा मुळचा वेस्ट इंडिजमधील बार्बेडोसचा. त्याचे वडिल फ्रँक आर्चर इंग्लंडचे तर आई जोले वेटे बारबाडियन आहे. वडिलांमुळे त्याला इंग्लंडचे नागरिकत्व मिळाले.  2014 मध्ये तीनवेळा 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजचे नेतृत्व करणाऱ्या जोफ्राने ईसीबी (इंग्लंड क्रिकेट बोर्ड) नियमावलीच्या पुर्ततेसह इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.  वयाच्या 18 वर्षानंतर सात वर्ष इंग्लंडचे नागरिकत्व असल्यासच जोफ्राला राष्ट्रीय संघात स्थान मिळणार होते. 2018 मध्ये इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपल्या नियमावलीत बदल करत हा कालावधी तीन वर्षांचा झाला अन् जोफ्रा आर्चरने आपल्या इच्छेने इंग्लंडच्या ताफ्यात स्थान मिळवण्यास यशस्वी ठरला. 

जॉर्डच्या मृत्यूनंतर वर्णभेदाच्या मुद्यावरुन गेलनं केला गौफ्यस्फोट

वेस्ट इंडिजच्या जोफ्राला 2019 च्या विश्वचषकात खेळण्याचीही संधी मिळाली. त्याचा इंग्लंडच्या ताफ्यात झालेला प्रवेश हा क्रिकेटमध्ये वर्णभेदापेक्षा गुणवत्तेला महत्त्व असल्याचे संकेत देणारा होता. खेळात जे अपेक्षित आहे तेच घडताना दिसत होते. खुद्द जोफ्रानेही एका मुलाखतीमध्ये गेलपेक्षा अगदी वेगळे मत मांडले होते. फुटबॉलपेक्षा क्रिकेटमध्ये वर्णभेदाचा मुद्दा गौण आहे, असे तो म्हणाला होता. पण न्यूझीलंड दौऱ्यावर त्याच्यावर वर्णभेदाचे संकट ओढावले.  

अमेरिकेतील 'त्या' घटनेवर व्यक्त होताना फेडरर झाला निशब्द!

नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात एका न्यूझीलंड चाहत्याने जोफ्राला वर्णभेदावरुन डिवचल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी ड्रेसिंगरुममध्ये जात असताना संबंधित न्यूझीलंड संघाच्या चाहत्याने जोफ्राला त्याच्या रंगावरुन अपशब्द वापरले. मैदानात घडलेला सर्व प्रकार जोफ्राने ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला होता. चाहत्याच्या वर्तणूकीमुळे न्यूझीलंड बोर्डावर जोफ्राची माफी मागण्याची वेळ आली. याशिवाय ऑकलंडमधील रहिवाशी असलेल्या आणि जोफ्रावर वर्णभेदाचा शाब्दिक मारा करणाऱ्या चाहत्याला न्यूझीलंड बोर्डाने शिक्षाही दिली. पुढील दोन वर्षे देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय सामने स्टेडियमवर पाहण्यास त्याच्यावर बंदी घालण्यात आली. न्यूझीलंडने हे प्रकरण गंभीरतेने घेतल्यामुळे क्रिकेटमध्ये वर्णभेद होत असला तरी न्याय देण्याची खंबीरता दाखवून न्यूझीलंडने एक उदाहरण दाखवून दिले होते. जोफ्रानेही या प्रकरणावर दु:ख व्यक्त केले होते. काळ बदलला आहे लोकांनीही बदलायला हवं, अशा शब्दांत त्याने असे प्रकार घडणे लाजीरवाणे असल्याचेही म्हटले होते.   

 


​ ​

संबंधित बातम्या