वर्णद्वेषासाठी सुद्धा मॅच फिक्सिंग किंवा डोपिंग सारखीच शिक्षा असावी - जेसन होल्डर

टीम ई-सकाळ
Sunday, 28 June 2020

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा कर्णधार जेसन होल्डर याने वर्णद्वेषासंदर्भात बोलताना, वर्णद्वेषासाठी सुद्धा मॅच फिक्सिंग किंवा डोपिंग सारखीच शिक्षा असावी, असे म्हटले आहे. 

अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय नागरिकाचा मिनियापोलिस शहरात एका श्वेत पोलिस अधिकाऱ्याने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता. त्यानंतर अमेरिकेसह जगभरात वर्णभेदाविरुद्ध आवाज उठण्यास सुरवात होऊन, ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ हे आंदोलन सुरु झाले. या आंदोलनाला क्रीडा क्षेत्रातील अनेक खेळाडूंनी पाठिंबा दर्शवला. तर काही खेळाडूंनी आपल्यासोबत घडलेल्या वर्णभेदाच्या आठवणी जगासमोर ठेवल्या. यामध्ये क्रिकेट जगतातील डॅरेन सॅमी, ख्रिस गेल आणि ड्वेन ब्राव्हो यांनी क्रिकेटमधील वंशविद्वेषाबद्दल जाहीर वाच्यता करत,  ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ या आंदोलनाला समर्थन दिले. यानंतर आता वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा कर्णधार जेसन होल्डर याने वर्णद्वेषासंदर्भात बोलताना, वर्णद्वेषासाठी सुद्धा मॅच फिक्सिंग किंवा डोपिंग सारखीच शिक्षा असावी, असे म्हटले आहे. 

राहुल द्रविड हा जगातील सगळ्यात जास्त 'अंडररेटेड' खेळाडू - इरफान पठाण

जेसन होल्डरने वर्णभेद हा आत्तापर्यंत कमी-जास्त प्रमाणात घट्ट खोलवर रुजलेला होता, मात्र आता तो खाली आला असल्याचे म्हटले आहे. शिवाय होल्डर याने वर्णद्वेषासंदर्भात भाष्य करताना, खेळात वर्णभेद हा मॅच फिक्सिंग किंवा डोपिंगच्या गुन्ह्यापेक्षा कमी समजला जाऊ नये असे म्हटले आहे. तसेच वर्णभेदावर देखील  मॅच फिक्सिंग किंवा डोपिंग सारखीच कडक शिक्षा असावी असे म्हणत, खेळामध्ये काही समस्या असतील तर त्यांच्यावर समान व्यवहाराने सामना करणे गरजेचे असल्याचे जेसन होल्डरने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वंशविरोधी संहितेअंतर्गत, जर एकाद्या खेळाडूने तिसऱ्या वेळेस उल्लंघन केल्यास त्या खेळाडूवर आजीवन बंदी घालण्यात येते. पण एखाद्या खेळाडूने पहिल्यावेळेस असा गुन्हा केल्यास, त्याच्यावर केवळ चार कसोटी सामन्यांसाठी किंवा काही षटकांसाठी बंदी घालण्यात येत असल्याचे जेसन होल्डरने नमूद केले. त्यामुळे कोणतीही मालिका सुरू होण्यापूर्वी अँटी-डोपिंग किंवा भ्रष्टाचारविरोधी मॅच फिक्सिंग प्रमाणेच वर्णभेदाविरुद्ध देखील माहिती देणे गरजेचे असल्याचे जेसन होल्डरने म्हटले आहे. आणि यापूर्वी आपल्यासोबत वर्णभेदाशी संबंधित कोणतीही घटना घडली नसल्याचे होल्डरने सांगत, यावर शिक्षणाची अधिक गरज असल्याचे म्हटले आहे. 

डिएगो मॅराडोनासमवेत अर्जेंटिनाला विश्वजेता ठरवणारा मार्गदर्शक कोरोना पॉझिटिव्ह
 

दरम्यान, यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदला दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू अँडिल फेहलूकवायोवर वर्णभेदावरून केलेल्या टीकेसाठी गेल्या वर्षी चार सामन्यांची बंदी घालण्यात आली होती. तर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्रू सायमंडने देखील यापूर्वी वर्णभेदाच्या मुद्द्याचा शिकार झाल्याचे म्हटले होते.                               

 


​ ​

संबंधित बातम्या