साहेबांच्या भूमीत कृष्णवर्णीय दुर्लक्षित; ECB न्याय देणार का?

टीम ई-सकाळ
Monday, 29 June 2020

सध्याच्या घडीला इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय संघात दिसणाऱ्या जोफ्रा आर्चर या कृष्णवर्णीय चेहऱ्यालाही संघात स्थान मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला. नियमात बदल केल्यामुळे जोफ्राचा इंग्लंडकडून खेळण्याचा मार्ग मोकळा झाला. 
 

लंडन : अमेरिकेतील जॉर्ज फ्लाइडच्या मृत्यूनंतर वर्णद्वेषाचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थितीत करण्यात येत आहे. विविध क्षेत्रात या किळसवाण्या प्रकाराचा निषेध नोंदवल्यात आल्यानंतर क्रिकेटर्सही वर्णद्वेषावर ठाम मत मांडताना पाहायला मिळाले. वर्णद्वेषाचा मुद्दा हा फुटबॉलपूरता मर्यादित नसून हा क्रिकेटमध्येही पाहायला मिळतो, असे वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने म्हटले होते. त्यानंतर अनेक क्रिकेटर यावर व्यक्त झाल्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार जेसन होल्डरनेही आपल्या मनातील भावना व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. वर्णावरुन भेदवाव करणाऱ्यावर मॅच फिक्सिंग आणि डोपिंगप्रमाणे कठोर कारवाई करायला हवी, असे वक्तव्य जेसन होल्डरने केले आहे. मैदानात जर तीनवेळा वर्णभेदाची टिपण्णी केली तर अशा खेळाडूला आजीवन बंदी घालायला हवी, असा सल्लाही होल्डरने आयसीसीला दिलाय.

ऑस्ट्रेलियात सापडला टेनिस 'फिक्सर'; बीसीसीआय काय पाऊल उचलणार

जगभरात 'ब्लॅक लाइव्ह मॅटर' मोहिम सुरु असताना कृष्णवर्णीयांना न्याय मिळावा या हेतूने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने खास मोहिम राबण्याची तयारी दर्शवली आहे.  मागील 25 वर्षांत इंग्लिश क्रिकेटमध्ये कृष्णवर्णीय खेळाडूंची संख्या ही जवळपास 75 टक्क्यांनी घटली आहे. ही दरी भरुन काढण्यासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड नवी मोहिम सुरु करण्याचा सकारात्मक विचार करत आहे. ईसीबीसोबत कार्यरत असणाऱ्या आफ्रिकन कॅरेबियन क्रिकेटर्स असोसिशएशन याप्रकरणात कृष्णवर्णीच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात स्वतंत्र चाचपणी करण्याची देखील तयारी सुरु केली आहे. आफ्रिकन कॅरेबियन क्रिकेटर्स असोसिएशनशी संलग्नित आणि सरेचे माजी खेळाडू लोंसडडेले स्किनर यांनी वर्णभेदाच्या मुद्यावरुन गंभीर आरोप केले आहेत. 1990 पासून इंग्लंडच्या संघातून कृष्णवर्णीयांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा दावा करत  ईसीबीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये एकही कृष्णवर्णीय अधिकारी का नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.   

बीसीसीआयला विस्मरण झाले की काय? कधी होणार विवोची गच्छंती...

या आरोपानंतर ईसीबीच्या प्रवक्त्याने क्रिकेट बोर्डाची बाजू मांडली. कृष्णवर्णीय खेळाडूंसर्भात काही अडचणी आहेत. त्यामुळे संघात त्यांचे प्रमाण कमी आहे. त्यांच्या समुदायासोबत चर्चा करुन यात बदल करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे ईसीबीच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. लीड्स बेकेट यूनिवर्सिटीच्या मागील वर्षीच्या रिपोर्टनुसार, 25 वर्षांत इंग्लिश काउंटीमध्ये कृष्णवर्णीय खेळाडूंची संख्या 75 टक्क्यांनी कमी झाली आहे.  1995 मध्ये जवळपास 33 कृष्णवर्णयी इंग्लिश काउंटीमध्ये खेळत होते. सध्याच्या घडीला ही संख्या केवळ 9 इतकी आहे. एवढेच नाही तर 18 काउंटी संघातील 118 सहाय्यक कर्मचाऱ्यांमध्ये केवळ दोन कृष्णवर्णयी दिसतात.  

क्रिकेटच्या मैदानातील 'हे' लाजिरवाणे रेकॉर्ड तुम्हाला माहित आहेत का?
 

सध्याच्या घडीला इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय संघात दिसणाऱ्या जोफ्रा आर्चर या कृष्णवर्णीय चेहऱ्यालाही संघात स्थान मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला होता. त्याचे वडिल इंग्लंडचे रहिवासी होते. पण तो बारबाडोसकडून खेळत होता. जोफ्रा 2015 मध्ये इंग्लंडमध्ये आला. पण इंग्लिश क्रिकेट बोर्डाच्या नियमानुसार 2022 पर्यंत त्याला इंग्लिश क्रिकेट संघात खेळणे शक्य नव्हते. ईसीबीने नोव्हेंबर 2018 मध्ये नियमात बदल केल्यामुळे जोफ्राचा इंग्लंडकडून खेळण्याचा मार्ग मोकळा झाला. 3 मे 2019 मध्ये त्याने इंग्लंडकडून पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. एवढेच नाही तर 2019 च्या विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाचा सदस्य होण्याची मानही त्याला मिळाला.  


​ ​

संबंधित बातम्या