अश्विनच्या अपयशामुळेच गमाविली मालिका : हरभजन

वृत्तसंस्था
Wednesday, 5 September 2018

इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाचव्या सामन्यापूर्वीच भारताला 3-1 असा पराभव स्वीकारावा लागला आहे. या पराभवानंतर माजी क्रिकेटपटूंकडून संघातील विविध खेळाडूंना दोषी ठरविले जात आहे. हरभजनसिंगने अश्विनची फिरकी प्रभावी न ठरल्याने भारताला पराभव स्वीकारावा लागल्याचे म्हटले आहे.

साउदम्पटन : भारताचा अव्वल दर्जाचा फिरकीपटू आर. अश्विन याच्या मालिकेतील अपयशामुळेच आपल्याला इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका गमवावी लागल्याचे, माजी फिरकीपटू हरभजनसिंग याने म्हटले आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाचव्या सामन्यापूर्वीच भारताला 3-1 असा पराभव स्वीकारावा लागला आहे. या पराभवानंतर माजी क्रिकेटपटूंकडून संघातील विविध खेळाडूंना दोषी ठरविले जात आहे. हरभजनसिंगने अश्विनची फिरकी प्रभावी न ठरल्याने भारताला पराभव स्वीकारावा लागल्याचे म्हटले आहे.

हरभजन म्हणाला, की चौथ्या कसोटी सामन्यात अश्विनला फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर बळी मिळविण्याची संधी होती. पण, त्याला बळी मिळविता आले नाहीत. त्याच तुलनेत मोईन अली सर्वोत्तम गोलंदाजी करत होता. मी पहिल्यांदा पाहिले, की इंग्लंडचे फिरकीपटू भारतीय फिरकीपटूंपेक्षा चांगली कामगिरी करत आहेत. अश्विनच्या अपयशामुळेच आपला 3-1 असा पराभव झाला. अश्विन हा चांगला गोलंदाज आहे, त्याने भारतासाठी अनेकवेळा चांगली कामगिरी केली आहे. पण, गरज असताना तो बळी मिळवू शकला नाही. 

​ ​

संबंधित बातम्या