अश्विनची चर्चा सुद्धा व्हायलाच हवी की

मुकुंद पोतदार
Saturday, 4 August 2018

चुरशीमुळे संघातील स्थान पणास
या मतप्रवाहाशिवाय आणखी एका कारणामुळे अश्विनवर दडपण होते. आता टिम इंडियामध्ये स्थान मिळविणे सोपे उरलेले नाही. त्यातही पुढील वर्षी इंग्लंडमध्येच वन-डे क्रिकेटचा वर्ल्ड कप होणार आहे. सध्याच्या चित्रानुसार कुलदीप यादव-युजवेंद्र चहल या फिरकी दुकलीला इन्स्टंट क्रिकेटसाठी स्वतः कर्णधार विराट पसंती देतो. अष्टपैलू क्षमता व सरस फिल्डींगमुळे रविंद्र जडेजा सुद्धा शर्यतीत आहे. अश्विन आता इन्स्टंट क्रिकेटसाठी पहिल्या पसंतीचा खेळाडू उरलेला नाही. किंबहुना या कसोटीत कुलदीपला दुसरा स्पीनर म्हणून खेळविले जाणार का, अशी चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर दोन्ही डावांत पहिली विकेट आणि ती सुद्धा कुकसारख्या कसलेल्या फलंदाजाची मिळवित अश्विनने स्ट्राईक बोलर म्हणून आपला लौकीक अधोरेखित केला.

तुम्हा मंडळींना माझी बोलिंग कळो किंवा ना कळो
मी टाकलेले चेंडू वळो किंवा ना वळो
याविषयीची एकूणच चर्चा टळो किंवा ना टळो
मी मात्र प्रतिस्पर्धी फलंदाजांना करून सोडणार सळो की पळो

क्रिकेट हा फलंदाजांचे अधिपत्य असलेला खेळ आहे आणि खेळाच्या आजवरच्या इतिहासात फलंदाजांनीच जास्त भाव खाल्ला आहे. असे असले तरी क्रिकेटमध्ये एक उक्ती प्रसिद्ध आहे. ती म्हणजे  To win a test match you need to take 20 wickets याचा अर्थ गोलंदाजांची कसोटीत कामगिरी तितकीच तोलामोलाची असते. किंबहुना पाच-सहाशे धावांचा डोंगर फलंदाजांनी उभारून जर गोलंदाजांनी 20 विकेट घेतल्या नाहीत तर सगळे मुसळ केरात जाते.

इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या कसोटीत विराटचे इंग्लंडमधील पहिलेवहिले शतक आणि तो वगळता इतर फलंदाजांचे अपयश याची चर्चा बरीच झाली आणि ही चर्चा तर होणारच आणि ती व्हायलाच हवी. पण या कसोटीत आणखी एका भारतीयाने आपली छाप पाडली आणि तो म्हणजे आर. अश्विन. त्यामुळे या अश्विनची चर्चा सुद्धा करायलाच हवी. या ऑफस्पीनरसाठी सुद्धा हा दौरा तितकाच महत्त्वाचा होता.

अश्विनचे बलस्थान किलर इन्स्टींक्ट
क्रिकेटींग ब्रेन असलेल्या अर्थात क्रिकेटपटू म्हणून चाणाक्ष-धुर्त-बुद्धिमान असलेल्या भारतीय क्रिकेटपटूंच्या अलिकडच्या पिढीत झहीर खान, महेंद्रसिंह धोनी आणि अश्विन यांचा उल्लेख केला जातो. तिघांमधील साम्य म्हणजे ते मैदानावर अगदी शांतचित्ताने आपले पूर्वनियोजीत डावपेच तडीस नेतात. अश्विनचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची किलर इन्स्टींक्ट. त्यामुळेच फलंदाज म्हणूनही तो चमक दाखवू शकला आहे.

नव्या चेंडूचे आव्हान
अश्विनने उपखंडात नव्या चेंडूवर मारा केला आहे, पण इंग्लंडमध्ये तसे करणे सोपे नाही. एजबस्टनला नाणेफेकीचा कौल विरोधात गेल्यानंतर विराटने पहिल्या डावात सातव्याच षटकात अश्विनला पाचारण केले. ईशांत शर्मा आणि उमेश यादव प्रत्येकी तीन षटकांत विकेट मिळविता आली नव्हती. कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या कसोटीच्या पहिल्या सत्रातील पहिल्या सेशनमध्ये ब्रेकथ्य्रू मिळणे अनन्यसाधारण महत्त्वाचे असते. इशांतने एक मेडन टाकली होती, पण उमेश यादवने 19 धावा मोजल्या होत्या. त्यामुळे विराटने अश्विनकडे चेंडू टाकला. तेव्हा हवामान ढगाळ होते आणि नवा ड्यूक्स चेंडू कठिण होता. यानंतरही अश्विनने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरविला.

कुकनामक बकरा
अश्विनने डावखुऱ्या फलंदाजांची नेहमीच त्रेधातिरपीट उडविली आहे. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला त्याने 14 इनिंगमध्ये नऊ वेळा आऊट केले आहे. यावेळी त्याने आपल्या दुसऱ्याच षटकात कुकला दांडी गुल केली. अश्विनने 12 इनिंगमध्ये त्याला आठव्यांदा टिपले.

याप्रसंगी एक उल्लेख करावा लागेल. वॉर्नर आणि कूक हे डावखुरे आणि सलामीवीर असले तरी फलंदाज म्हणून ते परस्परविरोधी जातकुळीतील आहेत. वॉर्नर हा अत्यंत स्फोटक फटकेबाजी करतो, तर कूक हा कॉपीबूक अर्थात तंत्रशुद्ध फलंदाज आहे.

कूक हा इंग्लंडचा मुख्य मोहरा होता. त्याचा अडसर दूर करून अश्विनने संघाचे मनोधैर्य उंचावले. याच अश्विनने ज्यो रूट हा विराटच्या थेट थ्रोवर धावचीत होईल यासाठी प्रसंगावधान दाखविले. अश्विनने मग बटलर, स्टोक्स या आयपीएलचा अनुभव असलेल्या खेळाडूंना जास्त टिकू दिले नाही. तळातून प्रतिआक्रमण रचणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉड याची विकेटही त्याने मिळविली.  

दुसऱ्या डावातही पहिली विकेट
या पार्श्वभूमीवर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात विराटने अश्विनकडे नवा चेंडू सोपविला नसता तरच नवल. अश्विन पुन्हा एकदा संघाच्या मदतीला धावून आला आणि त्याने कूकची शिकार केली. यावेळीही त्याने कुकची दांडी वाकविली. तिसऱ्या दिवशी अश्विनने किटॉन जेनिंग्ज आणि रूट असे मोहरे गारद केले. डावातील पहिल्या तीन विकेट त्याने टिपल्या. यामुळे तो वेगवान सहकाऱ्यांसाठी अनुकूल पाया रचू शकला.

इकॉनॉमी रेटचा मुद्दा
अश्विनने दोन्ही डावांत किफायतशीर मारा केला. इन्स्टंट क्रिकेटच्या युगात कसोटी क्रिकेटमध्येही इकॉनॉमी रेटला विलक्षण महत्त्व प्राप्त झाले आहे. या आघाडीवर अश्विनने उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्याचे काय महत्त्व आहे हे जाणून घेण्याआधी आपण आधी इकॉनॉमी रेटचे आकडे पाहूयात.

पहिल्या डावात सर्वोत्तम
पहिल्या डावातील अश्विनचा 2.38 हा इकॉनॉमी रेट भारतीय गोलंदाजांमध्ये सर्वत्तम होता. इशांत शर्मा (2.70), महंमद शमी (3.25), उमेश यादव (3.29) आणि हार्दिक पंड्या (4.60) यांच्या तुलनेत अश्विन सरस होता. त्याने सर्वाधिक चार विकेटही टिपल्या.

दुसऱ्या डावात वन्स मोअर
दुसऱ्या डावात अश्विनने या कामगिरीची पुनरावृत्ती केली. त्याची 2.80 सरासरी उमेश (2.85), शमी (3.16), इशांत (3.92) यांच्यापेक्षा सरस होती.

फिरकी गोलंदाजांना धावा रोखून धरणे महत्त्वाचे असते. याचे कारण त्यांच्या चेंडूविरुद्ध फुटवर्क अडजस्ट करून फलंदाज नावीन्यपूर्ण शॉट मारू शकतात. वेगवान गोलंदाजांसारखे फिरकी गोलंदाजांचे नसते. वेगवान गोलंदाज एक्स्प्रेस वेगाने चेंडू टाकून फलंदाजाला चकवू शकतात. फिरकी गोलंदाजांन मात्र धावा रोखून धरत दडपण आणणे आणि मग चेंडूच्या फ्लाईट किंवा टप्यात बदल करून त्यांना चकविणे अशा पद्धतीने विकेट मिळवाव्या लागतात. अश्विनने बटलर आणि स्टोक्स यांना टाकलेले चेंडू कमी वेगाचे होते.

अश्विनसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. मुख्य म्हणजे 2014 मध्ये विराटप्रमाणेच तो सुद्धा अपयशी ठरला होता. दोन कसोटींत तो केवळ तीन विकेट मिळवू शकला होता. त्यामुळे अश्विनला सुद्धा बरेच काही सिद्ध करून दाखविण्याची गरज होती. मायदेशात चेंडू वळणाऱ्या खेळपट्टीवरच तो विकेट मिळवू शकतो असा एक मतप्रवाह आहे आणि तो जोर धरत असतो. त्यावेळी ही मंडळी अश्विनने तीनशेहून जास्त विकेट मिळविल्या आहेत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही रन किंवा एकही विकेट फुकट मिळत नसते हे विसरतात.

चुरशीमुळे संघातील स्थान पणास
या मतप्रवाहाशिवाय आणखी एका कारणामुळे अश्विनवर दडपण होते. आता टिम इंडियामध्ये स्थान मिळविणे सोपे उरलेले नाही. त्यातही पुढील वर्षी इंग्लंडमध्येच वन-डे क्रिकेटचा वर्ल्ड कप होणार आहे. सध्याच्या चित्रानुसार कुलदीप यादव-युजवेंद्र चहल या फिरकी दुकलीला इन्स्टंट क्रिकेटसाठी स्वतः कर्णधार विराट पसंती देतो. अष्टपैलू क्षमता व सरस फिल्डींगमुळे रविंद्र जडेजा सुद्धा शर्यतीत आहे. अश्विन आता इन्स्टंट क्रिकेटसाठी पहिल्या पसंतीचा खेळाडू उरलेला नाही. किंबहुना या कसोटीत कुलदीपला दुसरा स्पीनर म्हणून खेळविले जाणार का, अशी चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर दोन्ही डावांत पहिली विकेट आणि ती सुद्धा कुकसारख्या कसलेल्या फलंदाजाची मिळवित अश्विनने स्ट्राईक बोलर म्हणून आपला लौकीक अधोरेखित केला.

कौंटी क्रिकेटचे प्लॅनिंग
याप्रसंगी उल्लेख केला त्याप्रमाणे अश्विनला क्रिकेटींग ब्रेन आहे. त्याने इंग्लंड दौऱ्याचे प्लॅनिंग मागील मोसमापासूनच केले होते. गेल्या मोसमात त्याला श्रीलंकेविरुद्धच्या इन्स्टंट क्रिकेट मालिकेसाठी ब्रेक देण्यात आला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशाच मालिकेत त्याला संधी मिळणार की नाही हे चित्र स्पष्ट नव्हते. अशावेळी अश्विनने प्लॅनिंग केले ते कौंटी क्रिकेट खेळण्याचे. त्याच्य प्लॅनिंगला राष्ट्रीय निवड समितीचा पाठिंबा होताच, पण  पुढाकार अश्विनने घेतला होता.

कौंटीत जोरदार पदार्पण
अश्विनने वुर्स्टरशायरकडून संधी मिळविली. त्याने पदार्पण जोरदार केले. ग्लुस्टरशायरविरुद्ध 94 धावांत तीन विकेट अशी कामगिरी त्याने केली. त्याने 29 षटके टाकली.

तेव्हा अश्विन म्हणाला होता की, हा केवळ 2018 मधील इंग्लंड दौऱ्यापुरता विषय नाही. कौंटी क्रिकेट खेळण्याचे माझे स्वप्न होते. मी भारतात टीव्हीवर कौंटीचे सामने पाहिले आहेत. इथे खेळून बराच अनुभव मिळतो असे अनेक स्पीनर्सनी मला सांगितले आहे. त्यामुळे आपणही येथे येऊन कौंटीचा अनुभव घ्यावा असे मला वाटले. हल्ली भरगच्च आंतरराष्ट्रीय वेळापत्रकामुळे अनुभव घेण्यासाठी प्रयोग करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही, पण तुम्ही तंत्र अन् मंत्र चटकन आत्मसात करू शकलात तर ते फलदायी ठरते आणि तुम्हाला अपेक्षित रिझल्ट मिळतात. मला अभिमान आहे की या बाबतीत मी वाकबगार आहे.

कौंटीत भरीव कामगिरी
अश्विनला वुर्स्टरशायरने शेवटच्या चार सामन्यांसाठी करारबद्ध केले होते. त्यात अश्विनने भरीव योगदान दिले. त्यामुळे वुर्स्टरशायरला अव्वल श्रेणीत बढती मिळविता आली. त्याने 20 विकेट टिपल्या. यात दोन फायफरचा (डावात पाच किंवा जास्त विकेट) समावेश होता. त्याने फलंदाजीत सहाव्या नंबरवर 42च्या सरासरीने धावा केल्या.

या मालिकेनंतरही कौंटी खेळणार
याप्रसंगी लेखाची सांगता करण्यापूर्वी आणखी एक उल्लेख करावा लागेल. अश्विन कसोटी मालिकेनंतर इंग्लंडमध्येच थांबणार आहे.  तो वुर्स्टरशायरकडून शेवटचे दोन कौंटी सामने खेळेल. त्याने तशा करारावर यापूर्वीच स्वाक्षरी केली आहे. इसेक्स आणि यॉर्कशायर या संघांविरुद्ध तो खेळेल.

असा हा अश्विन. त्याच्यावरील या चर्चेची सांगता करण्यापूर्वी ही चारोळी पुन्हा म्हणत त्याला सलाम करुयात.

संबंधित बातम्या