सिंधूला वर्ल्ड चॅम्पियन बनविणाऱ्या प्रशिक्षकानं अर्ध्यातच सोडली साथ

वृत्तसंस्था
Tuesday, 24 September 2019

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूवर वेगळेच संकट आले आहे. जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत तिला विजय मिळवून देण्यात ज्या प्रशिक्षकांनी मदत केली त्या किम जी ह्यून यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. 

चेन्नई : भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूवर वेगळेच संकट आले आहे. जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत तिला विजय मिळवून देण्यात ज्या प्रशिक्षकांनी मदत केली त्या किम जी ह्यून यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. 

ENGvsNZ : ऍशेसचा धसका; इंग्लंडने संघात केले 'हे' धक्कादायक बदल

वैयक्तिक कारणामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. दक्षिण कोरियाची असलेली किम गेल्या चार महिन्यांपासून सिंधूसोबत आहे. गेल्या काही आठवड्यांपूर्वी किम यांच्या पतीची तब्येत बिघडली. त्यामुळे किम यांना न्यूझीलंडला परतावे लागले होते.

Image result for sindhu world championship 2019 hd images with coach

एका इंग्रजी वृत्पत्राने दिलेल्या माहितीनुसार किमच्या पतीला सहा महिन्यांची विश्रांती घ्यावी लागणार आहे. या काळात त्याची देखभाल करण्याची गरज आहे. तसेच सर्जरीसुद्धा करावी लागू शकते आणि त्यांना परत येणं शक्य नसल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. 

Vijay Hazare Trophy : महाराष्ट्राचा संघ जाहीर; केदार जाधवकडे कर्णधारपद

गोपिचंद यांनी प्रशिक्षकांची कमतरता असल्याचं मत वर्ल्ड चॅम्पियनशिपनंतर व्यक्त केले होते. आता ऑलिम्पिकसाठी जास्त वेळ उरलेला नाही. त्यामुळे बॅडमिंटन असोसिएशनसमोर किमच्या जागी दुसऱ्या प्रशिक्षकाची निवड करण्याचं आव्हान आहे.


​ ​

संबंधित बातम्या