सिंधूचा पुन्हा पराभव; रौप्यवरच समाधान

वृत्तसंस्था
Tuesday, 28 August 2018

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला पुन्हा एकदा अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागल्याने रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या तई झु यिंग हिने सिंधूचा 21-13, 21-16 असा पराभव केला.

जकार्ता : भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला पुन्हा एकदा अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागल्याने रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या तई झु यिंग हिने सिंधूचा 21-13, 21-16 असा पराभव केला.

तईने अंतिम सामन्यात सुरवातीपासूनच वर्चस्व कायम राखले. पहिल्या गेममध्ये आपल्या चपळ खेळाच्या जोरावर 21-13 असे सहज नमवून सिंधूचे मनोधैर्य खचविले. दुसऱ्या गेममध्येही तईने आपला जोरदार खेळ कायम ठेवताना एकदाही सिंधूला वर्चस्व मिळविण्याची संधी दिली नाही. परिणामी सिंधूने दुसऱ्या गेमही 21-16 असा गमावून पुन्हा एकदा सुवर्णपदकाची लढत गमाविली. 

सिंधूने आशियाई क्रीडा बॅडमिंटन स्पर्धेत मिळविलेले हे रौप्यपदक ऐतिहासिक आहे. साईनाला उपांत्य फेरीत तईकडूनच पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे तिला ब्राँझ पदक मिळाले होते. आता सिंधूलाही तईने पराभूत करून आपले अव्वल स्थान कायम राखले.


​ ​

संबंधित बातम्या