जगातील सर्वात श्रीमंत महिला खेळाडूंच्या यादीत सिंधू सातवी

वृत्तसंस्था
Thursday, 23 August 2018

नवी दिल्ली :  फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीनुसार भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू ही जगातील सर्वात श्रीमंत महिला खेळाडूंच्या यादीत सातव्या स्थानावर आहे. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक पटकावणाऱ्या सिंधूने जून 2017 ते जून 2018मध्ये 85 लाख डॉलर कमावले. यात बक्षिस आणि जाहीरातींतून कमावलेल्या मानधनाचा समावेश आहे.

या यादीत प्रथम स्थानावर अमेरिकेची टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिचे नाव आहे. रिओ ऑलिम्पिकनंतर सिंधूने तिच्या खेळात कमालीची सुधारणा केली आहे. तिने यानंतर प्रत्येक मोठ्या स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. नुकत्याच झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतही तिने रौप्य पदक पटकावले होते. 

सर्वाधिक उत्पन्न मिळवणाऱ्या टॉप 10 महिला खेळाडू :
सेरेना विल्यम्स- 181 लाख डॉलर
कॅरोलिन वोझिनॅकी- 130 लाख डॉलर
स्लोन स्टिफन्स- 112 लाख डॉलर
गार्बिन मुगुर्झा- 110 लाख डॉलर
मारिया शारापोआ- 105 लाख डॉलर
व्हिनस विल्यम्स- 102 लाख डॉलर
पी. व्हि. सिंधू- 85 लाख डॉलर
सिमोना हॅलेप- 77 लाख डॉलर
डॅनिका पॅट्रीक- 75 लाख डॉलर
अॅजेलिक करबर- 70 लाख डॉलर
 
संबंधित बातम्या