सिंधूची पुन्हा अंतिम फेरीत धडक 

वृत्तसंस्था
Saturday, 4 August 2018

दोन वर्षांपूर्वी झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत सिंधू आणि मरिन असा सामना झाला होता. याच सामन्याचा पुढचा अंक उद्या जागतिक विजेतेपदासाठी सादर होणार आहे. 2016 मधील ऑलिंपिक अंतिम फेरी आणि 2017 तसेच आताच्या जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेची अंतिम फेरी, अशी कामगिरी सिंधूने केली. 

नॅनजिंग : दोन्ही गेमध्ये पिछाडीवर विजयाचे शिखर गाठणाऱ्या भारताच्या पी. व्ही. सिंधूने जपानच्या अकेन यामागुचीचा 21-16, 24-22 असा पराभव करून विश्‍व अजिंक्‍यपद बॅटमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. उद्या ऑलिंपिक विजेत्या कॅरोलिना मरिनविरुद्ध तिची विजेतेपदासाठी लढत होईल. सलग तीन सर्वोच्च बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवणारी सिंधू जगातील पहिली बॅडमिंटन खेळाडू ठरली आहे. 

दोन वर्षांपूर्वी झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत सिंधू आणि मरिन असा सामना झाला होता. याच सामन्याचा पुढचा अंक उद्या जागतिक विजेतेपदासाठी सादर होणार आहे. 2016 मधील ऑलिंपिक अंतिम फेरी आणि 2017 तसेच आताच्या जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेची अंतिम फेरी, अशी कामगिरी सिंधूने केली. 

जागतिक क्रमवारीत यामागुची दुसऱ्या आणि सिंधू तिसऱ्या स्थानी असली तरी सिंधूचा अनुभव मोठा आहे; परंतु आज दोन गेमध्ये विजय मिळवला असला तरी शर्थ करावी लागली. पहिल्या गेममध्ये सलग सात आणि दुसऱ्या गेममध्ये सलग आठ गेम मिळवत तिने पिछाडीवरून बाजी मारली. संघर्षपूर्ण झालेल्या दुसऱ्या गेममध्ये सिंधूने दोन मॅच पॉइंटही गमावले होते. यातील दुसरा मॅच पॉइंट तर 41 शॉर्टस्‌नंतर गमावला, तरीही तिने आत्मविश्‍वास कायम ठेवला आणि तिसऱ्या गेममध्ये संधीचा फायदा घेत विजय मिळवला. 

सिंधूच्या तुलनेत उंचीने कमी असलेली यामागुची आपल्या चपळतेवर काही गुण मिळवत होती. 5-0 अशी आघाडी घेत तिने केलेली सुरुवात सिंधूवरचे दडपण वाढवत होती; परंतु लगेचच सावरणाऱ्या सिंधूने 8-8 अशी बरोबरी साधली. त्यानंतर 10-10 अशी बरोबरी करताना सलग सात गुण घेतले, 13-12 अशी प्रथमच तिने आघाडी घेतली अणि 36 पॉइंटनंतर पहिला गेम जिंकला. 

दुसऱ्या गेमचीही सुरुवात तशीच होती. 2-6 अशा पिछाडीनंतर क्रॉस कोर्टचा अफलातून फटका सिंधूचा आत्मविश्‍वास वाढवणारा ठरला; परंतु 12-19 अशी पिछाडी असताना सिंधूने सलग आठ गुण मिळवण्याची जिद्द सादर केली. या वेळी तिचे खेळावरचे नियंत्रण, स्मॅश आणि क्रॉस कोर्ट फटके निर्णायक होते. या वेळी यामागुचीने सिंधूला जास्तीत जास्त रॅलीज खेळणे भाग पाडले. 41 शॉटर्सची रॅली याचाच भाग होता. हा दुसरा मॅच पॉइंट निसटला असला तरी सिंधूने संयम राखत विजय मिळवला. 

संबंधित बातम्या