आशियाई बॅडमिंटन : साईना, सिंधूला खुणावतेय विजेतेपद

वृत्तसंस्था
Tuesday, 23 April 2019

यापूर्वी 1964 मध्ये दिनेश खन्ना यांनी पुरुष एकेरीत विजेतेपद मिळविले होते; पण त्यानंतर आजपर्यंत भारताला विजेतेपदाने हुलकावणीच दिली आहे. मात्र, गेल्यावर्षी एच. एस. प्रणॉय आणि साईना नेहवाल यांनी ब्रॉंझपदक मिळविले होते. साईनाने यापूर्वी 2010 आणि 2016, तर सिंधूने 2014 मध्ये ब्रॉंझपदक मिळविले होते. आता विजेतेपदाचा दुष्काळ संपविण्यासाठी पुन्हा एकदा साईना आणि सिंधू या प्रमुख खेळाडूंवरच भारताच्या आशा केंद्रित आहेत. 

वुहान : प्रमुख खेळाडूंच्या माघारीमुळे भारताच्या साईना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांना आशियाई विजेतेपद खुणावत आहे. आशियाई बॅडमिंटन स्पर्धेला उद्या बुधवारपासून सुरवात होत आहे. भारताला 54 वर्षे या स्पर्धेत विजेतेपद मिळविता आलेले नाही. अशा वेळी प्रमुख खेळाडूंनी घेतलेली माघारीचा फायदा उठवून विजेतेपदाचा दुष्काळ संपविण्याची संधी या दोघींना चालून आली आहे. 

यापूर्वी 1964 मध्ये दिनेश खन्ना यांनी पुरुष एकेरीत विजेतेपद मिळविले होते; पण त्यानंतर आजपर्यंत भारताला विजेतेपदाने हुलकावणीच दिली आहे. मात्र, गेल्यावर्षी एच. एस. प्रणॉय आणि साईना नेहवाल यांनी ब्रॉंझपदक मिळविले होते. साईनाने यापूर्वी 2010 आणि 2016, तर सिंधूने 2014 मध्ये ब्रॉंझपदक मिळविले होते. आता विजेतेपदाचा दुष्काळ संपविण्यासाठी पुन्हा एकदा साईना आणि सिंधू या प्रमुख खेळाडूंवरच भारताच्या आशा केंद्रित आहेत. 

भारतीय खेळाडूंची डोकेदुखी राहिलेल्या अकाने यामागुची, शेन युफेई, रॅचनॉक इन्टॅनॉन, तई त्सु यिंग या प्रमुख खेळाडूंनी या स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळेच साईना आणि सिंधू यांना विजेतेपद खुणावत असेल, असे मानले जात आहे. गेल्यावर्षी वर्ल्ड टूर मास्टर्सचे विजेतेपद मिळविल्यानंतर सिंधू आता आशियाई विजेतेपदाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या मोहिमेस सायाका ताकाहाशीविरुद्ध सुरवात करेल. हा अडथळा दूर झाल्यानंतर सिंधूची गाठ पॉर्नपावी चोचुवोंग हिच्याशी पडेल. ही लढत जिंकल्यास तिच्यासमोर कोरियाच्या सुंग जी ह्यून हिचे आव्हान असण्याची शक्‍यता आहे. साईना आपली सुरवात चीनच्या हॅन यूएविरुद्ध करेल. साईनाची आगेकूच कायम राहिल्यास उपांत्यपूर्व फेरीत तिच्यासमोर जपानच्या अकाने यामागुची हिचे आव्हान राहील. 

पुरुष एकेरीत किदांबी श्रीकांत आपल्या मोहिमेस इंडोनेशियाच्या शेसा ऱ्हुस्तावितोविरुद्ध करेल. श्रीकांतला ही लढत सोपी आहे. दुसऱ्या फेरीत त्याची गाठ तिएन मिन्ह न्गुयेनशी पडेल. श्रीकांतने साखळीत आपली आगेकूच कायम राखल्यास उपांत्यपूर्व फेरीत त्याच्यासमोर ऑलिंपिक विजेत्या शेन लॉंगचे आव्हान राहील. 
पुरुष दुहेरीत अरुण जॉर्ज-शाम शुक्‍ला, एम.आर. अर्जुन-रामचंद्रन श्‍लोक, मनू अत्री-बी. सुमीत रेड्डी, तर महिला दुहेरीत पूजा दांडू-संजना संतोष, अपर्णा बालान-श्रुती केपी, मेघना जक्कामपुडी-पूर्विशा एस. राम या भारतीय जोड्यांचा समावेश असेल.

संबंधित बातम्या