बॅडमिंटन सरावाचा मुहूर्त टळला! फुलराण्या कधी उतरणार कोर्टवर?

टीम ई-सकाळ
Wednesday, 1 July 2020

भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू हैदराबादमधील गोपीचंद अकादमीत सराव करतात. मात्र हैदराबादमधील लॉकडाऊन पंधरा दिवसांनी वाढवण्याचा विचार होत आहे. लॉकडाऊन उठवल्यानंतर हैदराबाद तसेच तेलंगणातील कोरोना रुग्णांची संख्या खूपच वाढली आहे. या परिस्थितीत क्रीडा शिबिरांना परवानगी मिळण्याची शक्‍यता कमीच आहे. 

मुंबईः देशभरात अनलॉक-2 सुरू झालय खर पण क्रीडा क्षेत्र मात्र अजूनही लॉकडाऊनमध्ये असल्याचेच चित्र आहे. क्रीडा मंत्री रिजूजू यांनी  सावधगिरी बाळगून काही खेळांच्या सरावांना परवानगी दिलेली आहे. पण प्रत्येक राज्या राज्यांची परिस्थिती वेगळी आहे.  त्यानुसार त्यांचे मुख्यमंत्री निर्णय घेत आहेत. तेलंगणाची राजधानी हैदराबा ही बॅडमिंटनपटूंची खाण. पी. व्ही. सिंधू आणि साईना नेहवाल  हैदराबादमध्येच तयार झाल्या. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर 1 जुलै पासून सराव सुरू होणार होता. पण  मुहूर्त काही मिळालेला नाही. पी. व्ही. सिंधू, साईना नेहवालसह देशातील अव्वल बॅडमिंटनपटूंचा सराव उद्यापासून हैदराबादच्या गोपीचंद अकादमीत सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती; पण हे शिबिर लांबण्याचीच चिन्हे आहेत. 

चेंडूला चमकवण्यासाठी आयसीसीने दुसरा पर्याय देणं गरजेचे : भुवी

भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू हैदराबादमधील गोपीचंद अकादमीत सराव करतात. मात्र हैदराबादमधील लॉकडाऊन पंधरा दिवसांनी वाढवण्याचा विचार होत आहे. लॉकडाऊन उठवल्यानंतर हैदराबाद तसेच तेलंगणातील कोरोना रुग्णांची संख्या खूपच वाढली आहे. या परिस्थितीत क्रीडा शिबिरांना परवानगी मिळण्याची शक्‍यता कमीच आहे.  राष्ट्रीय मार्गदर्शक तसेच तेलंगणा बॅडमिंटन संघटनेचे सचिव असलेले गोपीचंद शिबिर सध्या सुरू करण्यास तयार नाहीत. लॉकडाऊन उठवल्यानंतरच्या पहिल्या आठवड्यात शिस्तीचे पालन केले जात होते. सुरक्षित अंतर राखले जात होते; पण त्यानंतर त्याची अंमलबजावणी होत नाही.

कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक षटकार लगावणारे खेळाडू माहित आहेत का? 

खेळाडूही सुरुवातीस मार्गदर्शक तत्त्वांचे कसोशीने पालन करतील; पण त्यानंतर हे घडेलच याची खात्री देता येत नाही. अनेक गोष्टी खुल्या केल्या आणि त्यामुळे कोरोनाची साथ वाढली तर त्यास आपणच जबाबदार असणार. सर्वकष विचार करूनच अंतिम निर्णय घ्यायला हवा, असे गोपीचंद यांनी सांगितले आहे. एच. एस. प्रणॉयने तिरुवअनंतपूरम येथे सराव सुरू केला आहे. हैदराबादच्या अकादमीतील सराव सुरू झाला, तरी प्रणॉय तातडीने हैदराबादला जाण्यास तयार नाही. पूर्णपणे खबरदारी घेऊन सराव सुरू आहे, असे प्रणॉयने सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या