पंजाबमधील स्टेडियमला मुख्यमंत्र्यांच्या वडिलांचे नाव

संजय घारपुरे
Monday, 10 August 2020

त्याला कार्यकारीणीने मंजूरी दिली. पंजाब संघटनेने यापूर्वीच बिंद्रा स्टेडियमच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुरु केली आहे. मुल्लानपूर येथे स्टेडियम उभारण्याची संकल्पना इंदरजित सिंग बिंद्रा यांची होती. 

चंडीगड :  पंजाब क्रिकेट संघटनेने मुल्लानपूर येथे उभारण्यात आलेल्या नव्या स्टेडियमला महाराजा यदविंद्र सिंग यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. यदविंद्र सिंग हे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे वडिल आहेत.  पतियाळाचे माजी महाराजा असलेले यदविंद्र 1934 मध्ये कसोटी खेळले होते. हे नाव देण्याचा प्रस्ताव पंजाब क्रिकेटे संघटनेचे अध्यक्ष राजिंदर गुप्ता यांनी मांडला.

CPL2020 : कॅरेबियन लीगमध्ये धावांची 'बरसात' करणारे आघाडीचे 5 फलंदाज!

त्याला कार्यकारीणीने मंजूरी दिली. पंजाब संघटनेने यापूर्वीच बिंद्रा स्टेडियमच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुरु केली आहे. मुल्लानपूर येथे स्टेडियम उभारण्याची संकल्पना इंदरजित सिंग बिंद्रा यांची होती. 
दरम्यान, या बैठकीत पंजाबमधील 30 ऐवजी 40 खेळाडूंना शिष्यवृ्ती देण्याचे ठरले. त्यात दहा मुलींचा समावेश असणार आहे. बैठकीचा हा मुख्य उद्देश होता असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

​ ​

संबंधित बातम्या