सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या खेळाडूंनी कमावली खेलो इंडियात आठ पदके

वृत्तसंस्था
Tuesday, 25 February 2020

एकूण जलतरण या क्रीडा प्रकारात आठ पदके प्राप्त करून  विजेते खेळाडूंनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाव पहिल्या  खेलो  इंडिया विद्यापिठ  स्पर्धांमध्ये मोलाची कामगिरी बजावली.

भारत सरकार युवा व क्रीडा मंत्रालय, स्पोर्टस् ऑथरीटी ऑफ इंडिया, ओरिसा राज्य,  ए आय यु, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ओरिसा - भुवनेश्वर येथे कलिंगा स्टेडीयम येथे आयोजित करण्यात आलेल्या  खेलो इंडीया  विद्यापीठ पोहणे  मुले /मुली स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या मिहिर आंबरे याने 50 मी. फ्री स्टाईल, 50 मी.बटर फ्लाय यादोन्ही क्रीडा प्रकारात सुवर्ण आणि साध्वी धुरी 50 मी. फ्री स्टाईल  क्रीडा प्रकारात सुवर्ण आणि 50 मी. बटरफ्लाय  या क्रीडा प्रकारात रौप्य, तसेच प्रसाद कन्डूल याने 200 मी. मिडले या क्रीडाप्रकारात ब्रॉंझपदक, मन्कर शेजवळ याने 50 मी. ब्रेस्टस्ट्रक मध्ये रौप्य, तर आर्या राजगुरू हिने 50 मी.बटरफ्लाय मध्ये सुवर्ण  पदक प्राप्त केलीत. अशी एकूण जलतरण   या  क्रीडा प्रकारात आठ पदके प्राप्त करून  विजेते खेळाडूंनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे नाव पहिल्या  खेलो  इंडिया विद्यापिठ  स्पर्धांमध्ये मोलाची कामगिरी बजावली.

सावित्रीबाई फुले  पुणे विद्यापिठाचे कुलगुरु  डॉ.नितिन करमळकर, उपकुलगुरु डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ  प्रफुल पवार, विद्यापिठाचे क्रीडा संचालक डॉ दीपक माने, सहा. क्रीडा संचालक डॉ  दत्ता  महादम आदींनी पदक विजेते खेळाडू, सहभागी खेळाडू,  संघव्यवस्थापक मनोहर कुन्जीर, पथक प्रमुख डॉ.नरेंद्र पाटील, दिलीप लोंढें,प्रमोद शिंदे, मधुकर पांडकर, दुशांत निंबाळकर, रणजीत चामले, अनिल  सोनवणे, तुषार थवानी, हेमंत कपिले, दीपक तारे आदी. सर्व व्यवस्थापक आणि मार्गदर्शकाचे अभिनंदन केले. 


​ ​

संबंधित बातम्या