पुण्यात होणार एकदिवसीय सामना

वृत्तसंस्था
Thursday, 30 August 2018

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर केला असून, सामन्याच्या तारखा आणि ठिकाणे ठरविली आहेत. सुरवातीला दोन कसोटी सामने खेळविले जाणार आहेत. त्यानंतर एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. भारतीय संघाच्या घरच्या मोसमाला या दौऱ्यापासून सुरवात होणार आहे. 

पुणे : वेस्ट इंडीजचा संघ भारतीय दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात दोन कसोटी, पाच एकदिवसीय आणि 3 ट्वेंटी-20 सामने खेळविले जाणार आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर केला असून, सामन्याच्या तारखा आणि ठिकाणे ठरविली आहेत. सुरवातीला दोन कसोटी सामने खेळविले जाणार आहेत. त्यानंतर एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. भारतीय संघाच्या घरच्या मोसमाला या दौऱ्यापासून सुरवात होणार आहे. 

भारतीय संघाच्या व्यस्त कार्यक्रमामध्ये आता या दौऱ्याचेही नियोजन करण्यात आले आहे. सध्या भारतीय संघ इंग्लंडमध्ये असून, त्यानंतर आशिया करंडकात खेळणार आहे. नंतर हा दौरा होणार आहे. मग भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या मायदेशात खेळणार आहे.

दौऱ्याचा कार्यक्रम : 
पहिली कसोटी - 4 ते 8 ऑक्टोबर (राजकोट)
दुसरी कसोटी - 12 ते 16 ऑक्टोबर (हैदराबाद)

पहिला एकदिवसीय सामना - 21 ऑक्टोबर (गुवाहाटी)
दुसरा एकदिवसीय सामना - 24 ऑक्टोबर (इन्दूर)
तिसरा एकदिवसीय सामना - 27 ऑक्टोबर (पुणे)
चौथा एकदिवसीय सामना - 29 ऑक्टोबर (मुंबई)
पाचवा एकदिवसीय सामना - 1 नोव्हेंबर (तिरुअनंतपुरम)

पहिला टी-20 सामना - 4 नोव्हेंबर (कोलकता)
दुसरा टी-20 सामना - 6 नोव्हेंबर (कानपूर किंवा लखनौ)
तिसरा एकदिवसीय सामना - 11 नोव्हेंबर (चेन्नई)

​ ​

संबंधित बातम्या