जिल्हास्तरीय बॅडमिंटन आजपासून; नरेंद्र, अदितीला अग्रमानांकन 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 22 December 2018

पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लब आणि हवेली तालुका बॅडमिंटन संघटना (एचटीबीए) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अकराव्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेस उद्यापासून (ता. 22) प्रारंभ होत असून, पुरुष गटात नरेंद्र पाटील आणि महिला गटात अदिती काळेला अग्रमानांकन देण्यात आले आहे. 

पीवायसी क्‍लबच्या बॅडमिंटन कोर्टवर 28 तारखेपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्यांना एकूण दोन लाख रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार असून, पन्नास हजार रुपयांची स्कॉलरशिपही दिली जाणार आहे, अशी माहिती स्पर्धेचे संयोजन सचिव उदय साने यांनी दिली. 

मानांकन असे :
पुरुष गट एकेरी :
नरेंद्र पाटील, सोहम नावंदर, अभिषेक बोराटे, विनीत कांबळे. 
दुहेरी : 1) नरेंद्र गोगावले व विनीत कांबळे, 2) अजित कुंभार व नरेंद्र पाटील, 3) अनिरुद्ध मयेकर व हृत्विक आंबेकर, 4) अभिषेक बोराटे व अमेय ओक. 

महिला एकेरी : अदिती काळे, स्वराली चिटणीस, रिया पवार, कल्याणी लिमये.
दुहेरी : 1) मानसी गाडगीळ व नूपुर सहस्रबुद्धे, 2) अदिती काळे व रिया जाईल.
मिश्र दुहेरी : 1) ऋतुराज देशपांडे व अदिती काळे, 2) समीर भागवत व मानसी गाडगीळ. 

40 वर्षांवरील : पुरुष : एकेरी : अमित तारे, निखिल साने, महेश कुलकर्णी, हरप्रीत सहानी. 
दुहेरी : 1) अमित देवधर व महेश उटगीकर, 2) हर्षवर्धन दामले व विश्वनाथ भिडे, 3) अनिरुद्ध जोशी व सुहास नाईक, 4) दीपक पटवर्धन व समीर भाटे. 

30 वर्षांवरील : पुरुष : एकेरी : अक्षय गद्रे, अपूर्व जावडेकर, अद्वैत सहस्रबुद्धे, हर्षद भागवत. 

19 वर्षांखालील मुले : एकेरी : सोहम नावंदर, प्रतीक धर्माधिकारी, पार्थ देशपांडे, आयुष खांडेकर. 
दुहेरी : 1) सोहम पाटील व तेजस देव, 2) चिन्मय कुलकर्णी व विराज बिदये.
मुली : एकेरी : तनिष्का देशपांडे, रिया कुंजीर, गौरी कुलकर्णी, सारिका गोखले. 
सतरा वर्षांखालील मुले एकेरी : प्रतीक धर्माधिकारी, सस्मित पाटील, आयुष खांडेकर, वर्धन डोंगरे, पार्थ घुबे. दुहेरी : 1) आयुष खांडेकर व पार्थ घुबे, 2) सस्मित पाटील व वेंकटेश अगरवाल. मुली एकेरी : साद धर्माधिकारी, शताक्‍क्षी किणीकर, रिद्धी पुडके, श्रेया शेलार. 

15 वर्षांखालील मुले एकेरी : प्रथम वाणी, वर्धन डोंगरे, सुवीर प्रधान, सोहम भुतकर, आदित्य लोगनाथन. दुहेरी : 1) आर्य ठाकोरे व ध्रुव ठाकोरे, 2) प्रथम वाणी व वर्धन डोंगरे, 3) लौकिक ताथेड व सोहम भुतकर, 4) रोनक गुप्ता व सुवीर प्रधान.
मुली : एकेरी : रुचा सावंत, श्रेया उत्पट, सायली फाटक, रिद्धी पुडके.
मुली : दुहेरी : 1) सानिका पाटणकर व संजना आंबेकर, 2) हिमाली परब व मधुरा फडणीस. 

13 वर्षांखालील मुले : एकेरी : आद्य पारसनीस, श्रेयस साने, यशराज कदम, अर्जुन भगत, क्रिश खातवड.
मुली : एकेरी : आरती चौगुले, अनन्या गाडगीळ, सानिका पाटणकर, संजना आंबेकर.

​ ​

संबंधित बातम्या