राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत पुण्याच्या पृथाने मारली बाजी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 November 2019

गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय (मध्य विभाग) मानांकन स्पर्धेत पृथाने सुहाना सैनीला हरवून हा मान मिळविला होता.

पुणे : पुण्याच्या पृथा वर्टीकरने 81व्या कॅडेट आणि सबज्युनियर गटाच्या राष्ट्रीय अजिंक्‍यपद टेबल टेनिस स्पर्धेत पंधरा वर्षांखालील मुलींच्या गटाचे विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा धरमशाला येथे पार पडली. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

या स्पर्धेच्या अंतिम लढतीत पृथा वर्टिकरने दिल्लीच्या लक्षिता नारंगचा 11-8, 9-11, 11-6, 11-9, 6-11 , 11-6 असा पराभव केला. पहिली गेम जिंकून पृथाने अपेक्षित सुरुवात केली हाती. मात्र, लक्षिताने दुसरी गेम जिंकत बरोबरी साधली. पृथाने या गेममधील चुका सुधारत सलग दोन गेम जिंकून आपली आघाडी भक्कम केली. मात्र, लक्षिताने जोरदार प्रतिकार करून पाचवी गेम जिंकत चुरस निर्माण केली. मात्र, अखेरच्या गेमला ती पृथाच्या अचूक खेळाला उत्तर देऊ शकली नाही.

- मनू भाकरचा विश्वकरंडकात 'सुवर्ण'वेध!

पृथाने संयमाने खेळ करत सहावा गेम जिंकत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत पृथा वर्टिकरने हरियानाच्या सुहाना सैनीला 11-5, 11-5, 11-8, 11-7 असे पराभूत केले होते. लक्ष्यचे पाठबळ लाभलेल्या पृथा वर्टिकरचे हे या वर्षातील राष्ट्रीय स्तरावरील सलग दुसरे विजेतेपद आहे.

INDvBAN : 'एक ही दिल है विराट भाई, कितनी बार जितोगे!'

गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय (मध्य विभाग) मानांकन स्पर्धेत पृथाने सुहाना सैनीला हरवून हा मान मिळविला होता. 2015 पासून चौथ्यांदा महाराष्ट्राच्या टेबल टेनिसपटूने राष्ट्रीय अजिंक्‍यपद स्पर्धेतील पंधरा वर्षांखालील मुलींच्या गटाचे विजेतेपद पटकावले. 

विजेती पृथा वर्टिकर ही शिवाजीनगर येतील मॉडर्न इंग्रजी माध्यम प्रशालेत आठवीत शिकत असून,ती रोहित चौधरीच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. 2008 नंतर राष्ट्रीय अजिंक्‍यपद स्पर्धेत विजेतेपद पटकावणारी पृथा ही पुण्याची पहिलीच खेळाडू ठरली. यापूर्वी 2008 मध्ये युवा विभागात मुलांच्या गटात अनिकेत कोपरकर; तर मुलींच्या गटात दिव्या देशपांडेने विजेतेपद मिळविले होते. त्यापूर्वी सुजय घोरपडे (1989) हा राष्ट्रीय विजेता ठरला होता. 

पाकविरुद्धची डेव्हिस करंडक लढत त्रयस्थ केंद्रावर खेळविण्यास आयटीएफची मान्यता

पृथाने राष्ट्रीय स्तरावरील एकूण चौथे विजेतेपद मिळविले. तीने यापूर्वी दोनदा राष्ट्रीय मानांकन स्पर्धेत बारा वर्षांखालील गटात ही कामगिरी केली होती.


​ ​

संबंधित बातम्या