कोकणकडा, सह्याद्रीचे रौद्ररुप अनुभवा मात्र, संभाळून...

संकेत जगताप
Wednesday, 28 November 2018

नुकतीच मात्र एका बातमीने सगळ्या ट्रेकर्स ची झोप उडवून टाकली होती. हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर 20 ट्रेकर्स अडकले आहेत. कोकणकडा रॅपलिंगसाठी गेलेले हे सर्व मध्येच अडकल्याने त्यांना एनडीआरएफच्या मदतीने आधी 500 फूट तर नंतर 300 फूट असे मजलदरमजल करत सुखरुप परत आणण्यात आले.

कोकणकडा रॅपलिंग म्हणजे प्रत्येक ट्रेकरचं स्वप्न. तब्बल आठशे फूट खेल दरीत एका दोराच्या जोरावर स्वत:ला झोकून द्यायलाही जिगर लागतो आणि प्रत्येक कसलेला ट्रेकर, आपल्या सह्याद्रीचा मावळा त्याच कोकणकड्यावर अपार श्रद्धा ठेवून ते हसतहसत लिलया करतोही. 

नुकतीच मात्र एका बातमीने सगळ्या ट्रेकर्स ची झोप उडवून टाकली होती. हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर 20 ट्रेकर्स अडकले आहेत. कोकणकडा रॅपलिंगसाठी गेलेले हे सर्व मध्येच अडकल्याने त्यांना एनडीआरएफच्या मदतीने आधी 500 फूट तर नंतर 300 फूट असे मजलदरमजल करत सुखरुप परत आणण्यात आले. या सर्व ट्रेकर्सची सुखरुप सुटकाही झाली. मात्र मुळ मुद्दा तोच राहतो, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या ट्रेकर्सच्या अपघातांचा. 

kokankada

कोकणकडा म्हणजे हरिशचंद्रगडाची ओळख आणि सह्याद्रीच्या रौद्र रुपाचे प्रतिक. कोकणकडा रॅपलिंगचे सध्या चांगलेच पेव उठले आहे आणि प्रत्येक ट्रेकरला एकदातरी हे रॅपलिंग करण्याची इच्छा असतेच. कल्याणचे डॉ. अडवाणी आणि त्यांचे 20 सहकारी देखील यातीलच एक. ते करण्याबद्दल काही हरकतही नाही. मात्र कोण कुठले हे ट्रेकर्स काहीही नियोजन न करता येतात, स्वतःची हुशारी आणि स्वतःचा पुरुषपणा सिद्ध करायला जातात आणि अडचणीत सापडतात. एकटे नाही तर सोबतच्या आणखी चार सहकाऱयांनाही अडचणीत आणतात. 

आपल्याला हे विसरुन चालणार नाही की या ट्रेकिंगचेही काही नियम असतात आणि सर्व ट्रेकर त्यांना बांधिल असतात. या नियमांच्याविरूद्ध जाण्याचा प्रयत्न केला तर दगाफटका हा बसणारच. कसलंही नियोजन न करता, सुरक्षिततेची हमी न बाळगता ट्रेकिंगला गेलं की अडचणी या येणारच.

ट्रेकिंगला जाताना मुळात म्हणजे गडावर पोहोचण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या वाटांची माहिती असणे गरजेचे आहे. प्रत्येक वाटेवर कोणत्या अडथळे, अडचणी आहेत यांचाही अभ्यास असावा लागतो. तसेच हे अडथळे पार करण्यासाठी लागणारे साहित्या सोबत असणे अत्यंत गरजेचे असते. या सर्व माहिती शिवाय कोणत्याही ट्रेकला जाणे तसे घातकच. 

हल्ली सगळ्यात नवीन निघालेले फॅड म्हणजे कोकणकड्यावर हॅगिंग टेंट लावून त्यातुन सूर्योदय बघणे, अरे बघाना सर्योदय, कोणी नाही म्हणत नाही. मात्र, त्यासाठी तुमच्या जीवाची बाजी लावण्याची काहीच गरज नाही. मी म्हणतो असं सगळं करून तुम्हाला नक्की बघायचं काय असतं, तर फक्त तो सूर्योदय. तो तर कोकण कड्यावर निवांत बसून पण बघता येतो. सह्यादी बघायचा असेल, अनुभवायचा असेल तर तो निवांत आणि  एकचित्ताने पाहायला हवा त्याच खरं सुख त्यातच आहे. प्रत्येक वेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून ते सौंदर्य पाहणे कितपत योग्य आहे? अश्या काही ट्रेकर्स मुळे बाकीच्या सर्व कसलेल्या आणि तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेल्या ट्रेकर्सच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जावू लागते. प्रत्येक ट्रेकरने सुरक्षेला प्राधान्य द्यायला हवे. 

स्वतःच्या जीवापेक्षा काहीही मोठं नाही हे माझ्या सारख्याच प्रत्येक ट्रेकरला कळायला हवे. स्वतःची सुरक्षितता सगळ्यात जास्त महत्वाची आहे. असे वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी आपणा सर्वांनाच एक जागरुक ट्रेकर बनण्याची गरज आहे.


​ ​

संबंधित बातम्या