सॅमीसोबतच्या वर्णभेदाचा पुरावा होतोय व्हायरल; हा भारतीय क्रिकेटर गोत्यात

टीम ई-सकाळ
Tuesday, 9 June 2020

वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलनंतर डॅरेन सॅमी याने इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) मधील सामन्यांच्या वेळेस आपल्याला असा अनुभव आल्याचा गौप्यस्फोट केला होता. यानंतर भारतातील अनेक खेळाडूंनी यावर प्रतिक्रिया देत डॅरेन सॅमीचे आरोप फेटाळले होते.

नवी दिली: अमेरिकेतील पोलिस कोठडीत जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीयाने आपला जीव गमावल्यानंतर वर्णभेदाविरुद्धच्या आंदोलनाचा वणवा पेटला आहे. सर्व जगभरात याचे पडसाद उमटताना पाहायला मिळते. 'ब्लॅक लाईव्हज मॅटर' या आंदोलनाच्या माध्यमातून सामान्य जनतेपासून ते विविध क्षेत्रातील दिग्गज या मुद्यावरुन संतप्त भावना व्यक्त करत आहेत. नुकत्याच वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलनंतर डॅरेन सॅमी याने इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) मधील सामन्यांच्या वेळेस आपल्याला असा अनुभव आल्याचा गौप्यस्फोट केला होता. यानंतर भारतातील अनेक खेळाडूंनी यावर प्रतिक्रिया देत डॅरेन सॅमीचे आरोप फेटाळले होते. मात्र यावर आता सोशल माध्यमावर एक जुनी पोस्ट व्हायरल होत आहे. त्यामुळे बरेच काही सामोरे येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.  

#वर्णभेदाचा_खेळ : तिच्या उदरातील बाळावरही झाली होती विकृत टिपण्णी

क्रिडा क्षेत्रातील खेळाडूंनी देखील पुढे येत वर्णभेदाविरुद्ध निषेध नोंदवत आहेत. मात्र या घटनेचे हादरे आता खेळ जगतालाही बसायला चालू झालेले आहेत. काही दिवसांपूर्वी वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ख्रिस गेलने वर्णभेदाच्या प्रकरणावर बोलताना, वर्णभेदासंदर्भात स्वतः देखील अनुभवल्याचे सांगत, फुटबॉल पासून क्रिकेट मध्ये सर्वच ठिकाणी काही प्रमाणात वर्णभेद केला जात असल्याचे म्हटले होते. यानंतर डॅरेन सॅमी याने इंडियन प्रीमिअर लीग मधील सामन्यात (आयपीएल) सनरायझर्स हैद्राबाद संघाकडून खेळत असताना माझ्यासह श्रीलंकन क्रिकेटपटू थिसारा परेराला वर्णभेदाचा सामना करावा लागल्याचे म्हटले होते. 

 '...तर BCCI ला IPL स्पर्धा घेण्याचा अधिकार'

डॅरेन सॅमीच्या या आरोपानंतर देशातील क्रिकेट जगतात खळबळ माजली. भारतीय क्रिकेट जगतातातील अनेक खेळाडूंनी हे आरोप फेटाळून लावले. पण भारताचा युवा गोलंदाज इशांत शर्मा याची एक जुनी इंस्टाग्राम पोस्ट सध्या बरीच व्हायरल होत आहे. सोशल माध्यमात पसरत असलेल्या या पोस्टमध्ये इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, डॅरेन सॅमी आणि डेल स्टेन दिसत आहेत. मात्र या पोस्टमध्ये इशांत शर्माने डॅरेन सॅमीचा उल्लेख काळू असा केला आहे. त्यामुळे इशांत शर्माच्या या पोस्टवरून क्रिकेट चाहते सध्या ईइशांतने माफी मागावी, अशी मागणी करत आहेत. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैद्राबाद संघाकडून खेळत असताना माझ्यासह थिसारा परेराला काळू या नावाने संबोधायचे. मात्र त्यावेळेस आपल्याला या शब्दाचा अर्थ माहित नव्हता. ज्यावेळी मला हा वर्णभेदाचा प्रकार होता हे समजतंय तेव्हा मला आता राग अनावर होतोय, अशा शब्दांत सॅमीने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.  

  


​ ​

संबंधित बातम्या