थेट प्रक्षेपणाची चढाई कबड्डीवरच ठरतेय भारी..!

ज्ञानेश भुरे
Saturday, 19 January 2019

कबड्डीसारख्या मराठमोळ्या खेळाला आशियाई क्रीडा स्पर्धेचे दरवाजे खुले झाल्यानंतरही वलय प्राप्त  होत नव्हते. कबड्डीपटूंची नावे ही आशियाई ते आशियाई स्पर्धेलाच कळत होती. खेळाडू देखील चार  वर्षांनीच समोर येत होते. अशा वेळी अचानक प्रो-कबड्डी लीगचे वादळ येऊन धडकले. एरवी वादळाने साऱ्या परिसराची नासधूस होतो. पण, इकडे वप्रोऩच्या वादळाने कबड्डीला सुगीचे दिवस आले. लीगमुळे कबड्डी जगभरातल्या घराघरात पोचली. कबड्डीला सुटाबुटातला प्रेक्षकवर्ग भेटला. पण, ते वादळच नासधूस करणारच.

कबड्डीसारख्या मराठमोळ्या खेळाला आशियाई क्रीडा स्पर्धेचे दरवाजे खुले झाल्यानंतरही वलय प्राप्त  होत नव्हते. कबड्डीपटूंची नावे ही आशियाई ते आशियाई स्पर्धेलाच कळत होती. खेळाडू देखील चार  वर्षांनीच समोर येत होते. अशा वेळी अचानक प्रो-कबड्डी लीगचे वादळ येऊन धडकले. एरवी वादळाने साऱ्या परिसराची नासधूस होतो. पण, इकडे वप्रोऩच्या वादळाने कबड्डीला सुगीचे दिवस आले. लीगमुळे कबड्डी जगभरातल्या घराघरात पोचली. कबड्डीला सुटाबुटातला प्रेक्षकवर्ग भेटला. पण, ते वादळच नासधूस करणारच. या कबड्डीच्या लोकप्रियतेचा परिणाम सकारात्मक व्हायच्या ऐवजी तो आता उलटा होऊ लागला आणि कबड्डीची होत असलेली नासधूस आता समोर योऊ लागली.

कबड्डीला राजमान्यता नेहमीच होती. ती कितीही प्रयत्न केले गेले तरी कमी होणार नाही. कबड्डीच्या सामन्यांना वेलेचे बंधन नाही, तरी प्रेक्षक आणि खेळाडू विना तक्रार रात्री उशिरापर्यंत कबड्डीच्या सामन्यांसाटी थांबतो आणि थांबणार हे सत्य आहे. या आघाडीवर कबड्डीला प्रो लीगने नवा चेहरा दिला. मैदानावरील कबड्डी बंदिस्त झाली. कबड्डीपटूंना मिळणार्या गलेलठ्ठ मानधनाने कबड्डीपटू सधन झाले. कबड्डीपटूला गल्लीबोळात ओळख मिळाली. खेळाडूच काय कबड्डी पंचांनाही ओळखले जाऊ लागले. ई...शी..माती असे म्हणत कबड्डी पासून दूर पळणारी इंग्लिश माध्यम प्रशालेतील मुळे कबड्डीकडे वळू लागली. शाळेच्या मधल्या सुटीत कबड्डीचे सामने रंगू लागले. हे सगळे झाले ऴप्रोऩ लीगमुळे यात शंकाच नाही. पण, या सगळ्याचे सार काय तर कबड्डीचा प्रचार  असेच म्हणता येईल. प्रसाराची  कबड्डीला गरजच नाही. तो आशियात कधीच पोचला आहे.

प्रो नावाचे वादळ कबड्डीसाठी नुकसान नाही,  तर फायदा घेऊन आले. कबड्डी आणि कबड्डीपटू व्यावयसायिक झाले असे भारतीय हौशी कबड्डी महासंघही  म्हणू लागला. पण,  वादळ येताना नेहमीच  संकट घेऊन येते. हे संकट कुणीच पाहिले नाही. ते संकट कबड्डीच्या अभ्यासकांच्या किंवा रक्ताच्या प्रत्येक थेंबात भिनलेल्या कबड्डीपटूंना दिसत  होते. पहिल्या एक दोन वर्षांनंतर भारतीय कबड्डी महासंघालाही प्रो लीगचे आयोजक टाळू  लागले. देशाची कबड्डी त्यांनी आपल्याच हाती घेतल्याचे चित्र भासू लागले. राष्ट्रीय स्पर्धेचे (कुमार गटापासून वरिष्ट गटापर्यंत) वेळापत्रक स्टारच्या सोयीनुसार ठरू लागले. त्यामुळे देशांतर्गत स्पर्धेचे महत्व कमी झाले. खेळाडू देखील राष्ट्रीय स्पर्धा खेळण्यात कुचराई करू लागले. आंतरराष्ट्रीय स्तरावर हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच होमार्या कमी स्पर्धांसाठी संघ निवडताना राष्ट्रीय स्पर्धे ऐवजी प्रो लीगच्या अनुभवाचा विचार घेतला जाऊ लागला. इतकेच नाही,  तर नियम देखील तेच ठरवू लागले.

होय, नियम तेच ठरवू लागले याचा प्रत्यय खेलो इंडिया स्पर्धेच्या निमत्ताने झालेल्या कबड्ड़ीच्या सामन्यां दरम्यान आला. या लीगसाठी नियुक्त करण्यात आलेल्या पंचांची नावे ही भारतीय कबड्डी महासंघाच्या मान्यतेनेच आली होती. मात्र, ते नियम महासंघाचे नाही, तर प्रो लीगचे पाळत होते. हे प्रत्येक सामन्यात दिसून आले. कबड्डीला म्हणे प्रो लीगमुळे शिस्त आली. सामना सुरू होण्यापूर्वी आणि सामना संपल्यावर तांत्रिक गुण देण्याची पद्धत येथेच पाहिली. ड्रेस कोडचा नियम एका सामन्यासाठी एक तर दुसर्या सामन्यासाठी दुसरा. बरं याबाबत पंचांकडे विचारणा केली, तर ते अभिमानाने सांगतात ही स्पर्धा प्रोच्या नियमानुसार होत आहे. प्रो चे थेट प्रसारणाचे जे नियम आहेत तेच येथे वापरले जातात. कारण या सामन्यांचेही थेट प्रसारण होत आहे. थेट प्रसारण नसते,  तर कुठले नियम वापरले गेले असते,असा प्रश्न विचारल्यावर मात्र प्रोचे गुणगान गाणारे सगळे पंच चुप्पीसाधून बसले. त्यांच्याकडेउत्तरच नव्हते. 

खेलो इंडिया ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर आणि त्यातही भारतीय शालेय क्रीडा महासंघाच्या नियमानुसार होत असताना, केवळ थेट प्रसारण होते म्हणून कबड्डीचे सामने हे प्रोच्या नियमानुसार होणे हे योग्य नाही. कबड्डीत कुठलाही सामना बरोबरीत सुटला तर आजही निर्णय अलाहिदा म्हणजे पाच-पाच चढायांमध्ये लागतो. कुठेही तीन-तीन मिनिटांचे डाव पाहिलेले नाहीत. या बाबतीतही पंचांकडे विचारणा केली असता त्यांनी हे प्रो चे नियम आहेत. आम्ही सर्वांना हे नियम सांगितले आहेत. प्रत्यक्षात सर्व राज्ये ही कबड्डी महासंघाच्या नियमांचा अभ्यास करून आलेली होती. त्यांना हे सगळे नवीन होते. खेलो इंडिया स्पर्धेत महासंघाचा एकही पदाधिकारी समोर आला नाही. सोयीनुसार पंच नियम  लावत होतो आणि त्याचा फटका संघांना बसत  होता. त्याचे रुपांतर अखेर वादात  व्हायचे ते झालेच. तमिळनाडूने आपले रौप्यपदक परत केले. 

खेलो इंडियातील सर्व सामना वादाशिवाय पार  पडत असताना कबड्डीतील या ऴप्रोऩच्या पंचांनी केलेल्या मनमानी कारभारामुळे गालबोट लागले आहे. हे सगळे घडत असतानाच आता ऴप्रोऩ कबड्डीमुळे येणारे संकट कसे मागच्या दाराने आले हे नक्कीच समोर आले. भारतीय कबड्डी महासंघावर सध्या न्यायलयीन  प्रशासक असल्याचा फायदा तर प्रो लीगचे संयोजक घेत नाहीत ना अशी भिती आता संघटकांना वाटू लागली आहे. केवळ थेट प्रक्षेपणाचे कारण पुढे करत कबड्डीचे नियम बदलले जाणार असतील, तर अवघड आहे. कबड्डी महासंघाने प्रो संयोजकांच्या हातात तर कबड्डी सोपविली नाही अशी  शंका देखील आता घेतली जाऊ लागली आहे. महासंघाने वेळीच पावले उचलली नाहीत,  तर भविष्यात कबड्डीतील आपले आस्तित्व अगदी मुळासकट नष्ट होईल. आशियाई कबड्डीत गमाविलेली सुवर्णपदके ही त्याची नांदी होती आणि खेलो इंडियातील नियमांचा बागुलबुवा हे नाट्य़ ठरले. आता हे नाट्य असेच सुरू ठेवायचे की त्यावर पडदा टाकायचा हे कबड्डी प्रशासकांनी ठरवायचे आहे. शेवटी कबड्डी आपली असली, तरी मर्जी ही त्यांची असणार आहे.
- ज्ञानेश भुरे


​ ​

संबंधित बातम्या