राहुलच्या सतत अपयशाने पृथ्वीला मिळणार संधी?

वृत्तसंस्था
Tuesday, 4 September 2018

भारताचा नवोदित खेळाडू पृथ्वी शॉने इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या दोन कसोटी सामन्यांच्या संघात स्थान मिळवले. आता तो त्याची पहिली कसोटी खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

साउदम्पटन : भारताचा नवोदित खेळाडू पृथ्वी शॉने इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या दोन कसोटी सामन्यांच्या संघात स्थान मिळवले. आता तो त्याची पहिली कसोटी खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

भारतीय संघाचे 19 वर्षाखालील विश्वकरंडकात नेतृत्व करणारा पृथ्वी शॉ आणि नवोदित हनुमा विहारी यांची अखेरच्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघात निवड करण्यात आली होती. भारताने चौथ्या सामन्यातील पराभवासह मालिकाही गमावली आहे. त्यातच भारताच्या सलामीचा प्रश्न कायम आहे आणि सलामीवीर लोकेश राहुलला एकाही सामन्यात छाप पाडता न आल्याने त्याला पाचव्या कसोटी संघात स्थान देण्यात येण्याची शक्यता आहे. 

राहुलला चारही सामन्यात संघात स्थान देण्यात आले होते मात्र इनस्विंग चेंडू खेळताना तो सातत्याने अडखळत आला आहे. त्याने स्लिपमध्ये उत्तम कामगिरी केली असली तरी प्रत्येक सामन्यात फलंदाजांना आलेले अपयश पाहता राहुलच्या ऐवजी पृथ्वी शॉला संधी मिळण्याची शक्यता आहे. पृथ्वी शॉने आतापर्यंत 14 प्रथम श्रेणी सामने खेळले आहे. चौथ्या सामन्याआधी त्याने फलंदजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली फलंदाजीचा कसून सराव केला. 

अश्विनच्या सहभागाबाबत साशंकता 
चौथ्या कसोटी सामन्याआधी भारताचा फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विनच्या मांडीचा स्नायू दुखावला होता. तत्काळ उपचार घेऊन तो चौथा सामना खेळला होता. परंतू चौथ्या सामन्यात फलंदाजी करताना त्याच्या दुखापतीने पुन्हा डोके वर काढल्याचे दिसून आले. त्यामुळे कदाचित त्याला पाचव्या सामन्यात विश्रांत देण्यात येईल. त्याच्याऐवजी कुलदीप यादव किंवा रवींद्र जडेजाला संधी मिळण्याची शक्यता आहे.


​ ​

संबंधित बातम्या