पृथ्वी शॉचा कसून सराव; भारतीय संघाचे स्वागत पावसाने

सुनंदन लेले
Tuesday, 28 August 2018

 तिसऱ्या कसोटी सामन्यातील विजय आणि त्यानंतर मिळालेल्या विश्रांतीमुळे भारतीय संघ चौथ्या कसोटी सामन्यासाठी नव्या उत्साहाने साऊदम्प्टनला पोचला असून, पावसाने त्यांचे स्वागत केले आहे. रविवारी पावसाची रिपरीप राहिली. सोमवार आणि मंगळवारी पावसाने विश्रांती घेतली तरी हवामान ढगाळच होते. अशाच वातावरणात भारताने रोजबाऊलच्या मैदानावर सराव केला. 

साउदम्प्टन : तिसऱ्या कसोटी सामन्यातील विजय आणि त्यानंतर मिळालेल्या विश्रांतीमुळे भारतीय संघ चौथ्या कसोटी सामन्यासाठी नव्या उत्साहाने साऊदम्प्टनला पोचला असून, पावसाने त्यांचे स्वागत केले आहे. रविवारी पावसाची रिपरीप राहिली. सोमवार आणि मंगळवारी पावसाने विश्रांती घेतली तरी हवामान ढगाळच होते. अशाच वातावरणात भारताने रोजबाऊलच्या मैदानावर सराव केला. 

भारतीय संघाचा सराव सुरू असताना सर्वांच्या नजरा पृथ्वी शॉ आणि हनुमा विहारी यांच्यावर होते. "अ' संघासाठी चांगली कामगिरी केल्यानंतर हे दोन्ही वरिष्ठ संघात आले आहेत. अर्थात, संघ व्यवस्थापन या दोघांच्या समावेशावर नाराज होते. विजयला वगळण्याचा निर्णय कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनाला रुचलेला नाही. कोहली वगळता सर्वच फलंदाज अपयशी होत असतानाच केवळ विजयला बळीचा बकरा केल्याचे संघ व्यवस्थापनाला वाटत आहे. 

मुख्य मैदानाला लागून असलेल्या सुरेख मैदानावर भारतीय संघाने आज सराव केला. सोमवारी प्रामुख्याने फलंदाजांना संधी मिळाली, तर मंगळवारी गोलंदाजांना प्राधान्य देण्यात आले. प्रशिक्षक संजय बांगर अंगात ताप असूनही फलंदाजीच्या सरावावर लक्ष ठेवून होते. त्यांनी देखील पृथ्वीला अधिक काळ मार्गदर्शन केले. 

नव्या पद्धतीप्रमाणे कसोटी सामन्याच्या आदल्या दिवशी सराव सक्तीचा नसल्यामुळेच भारतीय संघाने गेले दोन दिवस जवळपास तीन तास सराव केला. आधीच्या कसोटीत पराभव झाला किंवा विजय मिळाला असला, तरी कोहलीने आतापर्यंत प्रत्येक सामन्यात बदल केले आहेत. चौथा सामनाही त्याला अपवाद राहणार नाही. संघात एखाद दुसरा बदल अपेक्षित असल्याचे दबक्‍या आवाजात येथे बोलले जात आहे. मात्र, नेमके कुणाला वगळले जाणार किंवा कुणाला संधी मिळणार हे अजून समोर आलेले नाही.
 


​ ​

संबंधित बातम्या