पृथ्वी शॉचे कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 December 2019

धडाकेबाज सलामीवीर पृथ्वी शॉने मुंबई संघात पुनरागमन केले आहे. उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्यानंतर बंदीचा सामना करणारा पृथ्वी शॉ मुश्‍ताक अली स्पर्धेच्या अखेरच्या काही सामन्यातून पुन्हा मुंबई संघासाठी पात्र ठरला होता. 

मुंबई : सर्वाधिक 41 वेळा रणजी करंडक जिंकणाऱ्या मुंबईने आगामी रणजी मोसमासाठी उपलब्ध असलेल्या खेळाडूंतून आपला सर्वोत्तम संघ जाहीर केला. सुर्यकुमार यादवकडे तीन वर्षानंतर पुन्हा नेतृत्व देण्यात आले आहे. बंदीनंतर पृथ्वी शॉचेही संघात पुनरागमन झाले आहे. 

IPL 2020 : अभी जोश बाकी है! मॅक्सवेल आयपीएलच्या लिलावात

मिलिंद रेगे यांच्या निवड समितीने जाहीर केलेल्या 15 खेळाडूंच्या संघात भारताचा उपकर्णधार अजिंक्‍य रहाणेचाही समावेश करण्यात आला आहे. रहाणे दोन वर्षानंतर मुंबई संघातून खेळणार आहे. टीम इंडियाच्या व्यस्त कार्यक्रमामुळे रहाणेला गेल्या दोन वर्षांत मुंबईतून खेळण्याची संधीच मिळाली नव्हती. 

Image result for prithvi shaw test images

धडाकेबाज सलामीवीर पृथ्वी शॉने मुंबई संघात पुनरागमन केले आहे. उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्यानंतर बंदीचा सामना करणारा पृथ्वी शॉ मुश्‍ताक अली स्पर्धेच्या अखेरच्या काही सामन्यातून पुन्हा मुंबई संघासाठी पात्र ठरला होता. 

माहितीये का, अजिंक्य रहाणे दोन वर्षानंतर कोणत्या संघातून पुन्हा खेळणार आहे?

मुंबईचा मधल्या फळीतील हुकमी फलंदाज सिद्धेश लाडचे शुक्रवारी शुभमंगल असल्यामुळे बडोद्याविरुदधच्या पहिल्या सामन्यासाठी त्याचा विचार करण्यात आलेला नाही 

असा आहे मुंबईचा संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), आदित्य तरे (उपकर्णधार), अजिंक्‍य रहाणे, पृथ्वी शॉ, जय बिश्‍त, शुभम रांजणे, आकाश पारकर, सर्फराझ खान, शम्स मुलानी, विनायक भोईर, शशांक अत्तारदे, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, धवल कुलकर्णी आणि एकनाथ केरकर.  


​ ​

संबंधित बातम्या