भारतीय संघात 'ज्युनियर तेंडुलकर'चा समावेश

वृत्तसंस्था
Thursday, 23 August 2018

संघ : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे, रिषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, आर. अश्‍विन, रवींद्र जडेजा, जसप्रित बुमरा, इशांत शर्मा, महंमद शमी, उमेश यादव, शार्दुल ठाकूर, करुण नायर, दिनेश कार्तिक, हनुमा विहारी. 

नवी दिल्ली : तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात विजय मिळविल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने तातडीने चौथ्या आणि पाचव्या कसोटी सामन्यासाठी ज्युनियर तेंडुलकर अशी ओळख असलेला युवा क्रिकेटपटू मुंबईचा खेळाडू पृथ्वी शॉ आणि हनुमा विहारी यांचा संघात समावेश करण्याचा निर्णय घेतला. 

सलामीचा फलंदाज मुरली विजय आणि चायनामन कुलदीप यादव यांना वगळण्यात आले आहे. दोघांनाही मायदेशात बोलावून घेण्यात आले आहे. गेल्या अकरा डावांत सहा वेळा केवळ एकेरीच धावा करू शकणाऱ्या विजयला तिसऱ्या कसोटीतूनही वगळण्यात आले होते. त्याच्या जागी स्थान मिळालेल्या शिखर धवनने समाधानकारक कामगिरी करून आपले स्थान टिकविले.

कुलदीपला वगळून फलंदाज हनुमा विहारीलाच संधी देण्यात आली. प्रशिक्षक शास्त्री अश्‍विनच्या कामगिरीवर समाधानी असून, फिरकीसाठी जडेजाचा पर्याय असल्याचे मत व्यक्त केल्याने हा बदल करण्यात आला. कुलदीपचा भारत अ संघात समावेश करण्यात आला असून, तो ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या दोन चार दिवसांच्या सामन्यात खेळेल. 

संघ : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे, रिषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, आर. अश्‍विन, रवींद्र जडेजा, जसप्रित बुमरा, इशांत शर्मा, महंमद शमी, उमेश यादव, शार्दुल ठाकूर, करुण नायर, दिनेश कार्तिक, हनुमा विहारी. 

संबंधित बातम्या