INDvsNZ : आधीच फलंदाजीची वाट लागलीये, आता 'हा' जखमी झाला

वृत्तसंस्था
Thursday, 27 February 2020

भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉच्या डाव्या पायाला अचानक सूज आली आहे आणि त्यामुळेच तो दुसऱ्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. त्याच्या पायाला आलेला सूजमुळे त्याने आज सरावातही सहभाग घेतला नाही.

ख्राईस्टचर्च : न्यूझीलंड दौऱ्यावर टी20 मालिकेनंतर एकदिवसीय आणि कसोटी सपाटून मार खाणाऱ्या टीम इंडियाची डोकेदुखी आणखी वाढली आहे कारण, भारताचा एका फलंदाजाला दुखापत झाली असून तो दुसऱ्या सामन्यात खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे.

Women's T20 World Cup : विजयाची हॅटट्रीक; भारताची सेमी फायनलमध्ये धडक

भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉच्या डाव्या पायाला अचानक सूज आली आहे आणि त्यामुळेच तो दुसऱ्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. त्याच्या पायाला आलेला सूजमुळे त्याने आज सरावातही सहभाग घेतला नाही. त्याची आज रक्त तपासणी केली जाईल आणि मगच त्याच्या सहभागावर निर्णय घेतला जाईल. 

Women's T20 World Cup : वय 16, पहिला वर्ल्डकप अन् केला 'हा' खतरनाक रेकॉर्ड 

जर त्याचे रिपोर्ट्स योग्य आले तर तो उद्या सराव करु शकतो. मात्र, जर त्याला फलंदाजी करताना अडचण येत असेल तर त्याला अंतिम संघात स्थान दिले जाणार नाही.   

मॅक्सवेलची विकेट पडली; केला भारतीय मुलीशी साखरपुडा

याआधीच भारतीय संघाला दुखापतींनी ग्रासले आहे. सलामीवीर रोहित शर्मासुद्धा दुखापतीमुळेच संघाबाहेर आहे. अशावेळी पृथ्वीला झालेली दुखापत भारतासाठी मोठी डोकेदुखी ठरु शकते. पृथ्वीच्या अनुपस्थितीत आता लोकेश राहुल आणि शुभमन गिल यांच्यापैकी कोणाला स्थान मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीला 29 तारखेपासून सुरवात होणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या