INDvsNZ : रोहित सावध राहा; पृथ्वी करतोय कसोटीत पुनरागमन
भारतीय संघ फेब्रवारीमध्ये न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी कसोटी संघात पृथ्वीला संधी मिळण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा आणि मयांक अगरवाल हे दोघेच सलामीला उतरतील. त्यांना बॅकअप म्हणून पृथ्वी शॉला संघात स्थान देण्यात येऊ शकते.
नवी दिल्ली : भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉवरील बंदी आता उठली असून तो सआद मुश्ताक अली स्पर्धेतही खेळला. त्यानंतर आता तो टीम इंडियात पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप
भारतीय संघ फेब्रवारीमध्ये न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी कसोटी संघात पृथ्वीला संधी मिळण्याची शक्यता आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार रोहित शर्मा आणि मयांक अगरवाल हे दोघेच सलामीला उतरतील. त्यांना बॅकअप म्हणून पृथ्वी शॉला संघात स्थान देण्यात येऊ शकते.
तसेच न्यूझीलंडमध्ये सराव व्हावा म्हणून पृथ्वीसह पुजारा, रहाणे आणि मयांक अगरवाल भारत अ कडून एक सामना खेळणार आहेत.
INDvsWI : शिखर धवन एकदिवसीय मालिकेतूनही बाहेर
त्याने सईद मुश्ताक करंडकात चांगली कामगिरी केल्यावर त्याने रणजी करंडकातही चांगले पुनरागमन केले. त्याने बडोदाविरुद्ध झालेल्या सामन्यात 62 चेंडूंमध्ये 66 धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने 11 चौकार आणि एक षटकार मारला होता.
आधी दुखापत आणि मग आलेली बंदी यामुळे त्याचे कसोटी संघातील स्थान त्याला गमवावे लागले. आता तेच स्था परत मिळविण्यासाठी तो जोमाने प्रयत्न करणार यात काहीच शंका नाही.