'पत्रास कारण की...'; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कॅप्टन कूलला पत्र!

टीम ई-सकाळ
Thursday, 20 August 2020

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महेंद्रसिंग धोनीला त्याच्या क्रिकेट मधील सेवानिवृत्तीवर शुभेच्छा दिल्या आहेत. 

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी संध्याकाळी धोनीने आपल्या आवडत्या गाण्यासोबत सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम वरून आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून संन्यास घेत असल्याची घोषणा केली. धोनीच्या या निर्णयाचा क्रिकेट जगतासह सर्वांनाच मोठा धक्का बसला. क्रिकेट मधील अनेक आजी-माजी खेळाडूंनी धोनीच्या निर्णयाचा आदर करत यावर प्रतिक्रिया दिल्या. त्यानंतर आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महेंद्रसिंग धोनीला त्याच्या क्रिकेट मधील सेवानिवृत्तीवर शुभेच्छा दिल्या आहेत. 

शतकांनी हुलकावणी दिलेला भारताचा सलामीवीर काळाच्या पडद्याआड 

महेंद्रसिंग धोनीने मागील शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निरोप घेतला. त्याच्या या निर्णयानंतर क्रिकेट विश्वासह सर्व क्षेत्रातल्या अनेक जणांनी धोनीला क्रिकेट मधून संन्यास घेतल्यानंतर शुभेच्छा दिल्या आहेत. तर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासह अन्य इतरांनी धोनीच्या निरोपासाठी विशेष फेअरवेल सामना आयोजित करण्याची मागणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) केली होती. यानंतर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महेंद्रसिंग धोनीला त्याच्या निवृत्तीवर शुभेच्छा देत पत्र लिहिले आहे. नुकतेच नरेंद्र मोदींनी पाठवलेले हे पत्र धोनीने आपल्या ट्विटरवर शेअर केले असून, या पत्रात मोदींनी धोनीला 15 ऑगस्ट रोजी आपल्या नम्र शैलीत सोशल मीडियावर अपलोड केलेला व्हिडिओ संपूर्ण देशासाठी एक मोठी चर्चा होण्यासाठी पुरेसा ठरल्याचे म्हटले आहे. व यानंतर 130 कोटी भारतीय निराश झाले, परंतु गेल्या दीड दशकात आपण भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाबद्दल कायमचे आभारी असल्याचे मोदींनी पुढे या पत्रात नमूद केले आहे. 

...जेंव्हा विराट कोहलीने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले ; वाचा सविस्तर   

याशिवाय आपली क्रिकेट कारकीर्द पाहण्याचा मार्ग म्हणजे आकडेवारी. आणि ती पाहिल्यास भारताला जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानी नेण्यात कर्णधार म्हणून सर्वात यशस्वी कामगिरी केल्याचे स्पष्ट होते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. तसेच जगातील सर्वात महान क्रिकेटपटू आणि यष्टीरक्षक यांच्यात आपल्या नावाची गणना इतिहासात होणार असल्याचा उल्लेख मोदींनी केला आहे. याव्यतिरिक्त 2011 च्या विश्वचषक मधील खडतर परिस्थितींमध्ये आपली विश्वासार्हता आणि अंतिम सामन्यातील शैली पिढ्यान पिढ्या स्मरणात राहणार असल्याचे मोदींनी यामध्ये सांगितले आहे. 

धोनीच्या फेअरवेल सामन्यासाठी बीसीसीआय तयार 

त्यानंतर, पुढे एका छोट्या गावातून सुरवात करत, भारताला अभिमान वाटेल अशी कामगिरी केल्याचे मोदींनी या पत्रात म्हटले असून, यासोबतच खेळातील आपला प्रवास आणि आचरण पुढील कोट्यावधी तरुणांना बळ आणि प्रेरणा देणार असल्याचे अधोरेखित केले आहे. व याचमुळे आपण नव्या भारताचे प्रतिनिधित्व करत असल्याचे नरेंद्र मोदींनी यामध्ये सांगितले आहे. तसेच 2007 मधील टी-20 वर्ल्डकपच्या आठवणींचा उजाळा देखील मोदींनी या पत्रात केला आहे.  शिवाय जवनांबद्दल आपले असणारे विशेष प्रेम आणि त्यांच्यासाठीची असणारी चिंता हे कौतुकास्पद असल्याचे मोदींनी सांगितले. 
 

यासोबतच पुढील वाटचालीसाठी एम एस धोनीला शुभेच्छा देताना नरेंद्र मोदींनी, एका घटनेची आठवण करून दिली आहे. ज्यामध्ये धोनी आपल्या मुलीसमवेत खेळताना दिसत आहे आणि इतर सर्वजण स्पर्धेतील विजयाचा आनंद साजरा करत आहेत. आणि यावरूनच व्यावसायिक आणि वैयक्तिक प्राधान्यक्रमातील  संतुलन कसे ठेवता येईल हे आजच्या पिढीला शिकण्यासारखे असल्याचे मत  मोदींनी व्यक्त केले आहे. 

धोनीच्या निवृत्तीनंतर न्यूज चॅनलने लावला भलत्याच 'युवराज सिंग'ला फोन; VIDEO VIRAL  

दरम्यान, भारतीय क्रिकेटच नव्हे तर संपूर्ण क्रिकेट विश्‍वात इतिहास घडवणाऱ्या धोनीच्या निवृत्तीने क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यापूर्वी धोनीने 2007 पासून ते 2016 पर्यंत भारतीय संघाच्या नेतृत्व पदाची धुरा सांभाळली होती. या कालावधीत भारताने 2007 मध्ये टी20 वर्ल्ड कप, 2011 मध्ये आयसीसी वर्ल्ड कप आणि 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.                          


​ ​

संबंधित बातम्या